ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

गॅस टंचाईच्या सावटात राज्यात प्रशासनाचे धाडसत्र!:पंढरपूर आणि गोंदियात घरगुती सिलिंडरचा अवैध वापर उघड, गुन्हे दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपूर येथील सांगोला नाका परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा रिक्षामध्ये अवैध भरणा करून विक्री करणाऱ्या गणेश बोरीकर याच्याविरोधात जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली असून, याप्रकरणी पंढरपूर पोलिसांत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत पथकाने घरगुती वापराच्या 8 आणि व्यावसायिक वापराच्या 5 अशा एकूण 13 गॅस टाक्या जप्त केल्या असून, आरोपीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या अवैध विक्रीसाठी गॅसचा पुरवठा करणाऱ्या संबंधित एजन्सीचाही शोध सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यात हॉटेल व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने गोंदिया आणि तिरोडा येथील दोन हॉटेल्सवर धाड टाकून 7 सिलिंडर जप्त केले आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या एलपीजी तुटवड्याच्या अफवांमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे समोर आले असून, या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभर ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला असून, महाराष्ट्रात सध्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल आणि उपहारगृहांचे चक्र विस्कळीत झाले असून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. तसेच, उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीची मुदत आता 25 दिवसांची करण्यात आली असून, या बदलाचा मोठा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर