ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन:महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता वाढावी आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना खेळांमध्ये अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आयोजित ‘अस्मिता लीग’ चे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुल मैदानावर महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री खडसे यांनी सायकल स्पर्धा आणि वॉकेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI) संचालिका डॉ. मोनिका घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, फिट इंडिया ॲम्बेसेडर व बॉडीबिल्डर विक्रम जाधव तसेच क्रीडा अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला खेळाडू उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री खडसे म्हणाल्या की, देशाला 2036 पर्यंत विकसित भारत बनविण्याचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. युवा पिढीने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून विविध खेळांच्या माध्यमातून युवक-युवतींना निरोगी ठेवता येते. तंदुरुस्त युवा पिढीमुळे देश विविध क्षेत्रात प्रगती करू शकतो. क्रिकेटसह इतर अनेक खेळांमध्येही उज्वल भविष्य असून पालकांनी मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून देशभरातील जिल्ह्यांमध्ये ‘अस्मिता लीग’चे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि इतर अनेक करिअरच्या संधीही उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनाही अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात यश संपादन करणाऱ्या मुलींचा मंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे यांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर