ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजितदादांचा ‘सुनियोजित मर्डर’:तपास यंत्रणांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? विकास लवांडे यांचा खळबळजनक आरोप

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार यांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच, आता एका धक्कादायक विधानाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अजितदादांचा झालेला मृत्यू हा निव्वळ अपघात नसून तो एक सुनियोजित मर्डर आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा अंत झाला. या घटनेला महिना उलटला तरी संशयाचे धुके कायम आहे. विकास लवांडे यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून शासन आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. विकास लवांडे पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांचा विमान अपघात प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे, अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत, असे खळबळजनक ट्विट लवांडे यांनी केले आहे. नेमके लवांडेंचे ट्विट काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे म्हणाले की, शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत. इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत हे लक्षात येईल, असे ट्विट करत म्हटले आहे.

तपास अधिकाऱ्याचे नाव गायब; रोहित पवारांचा संशय दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक महिना उलटला आहे. डीजीसीएच्या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले आहेत. विमान अपघातापूर्वी घटनास्थळाची ‘रेकी’ झाली होती,” असा धक्कादायक आरोप करत रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणाची ‘क्रिमिनल अँगल’ने चौकशी करण्याची मागणी केली आहे. VSR कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा तपास अधिकाऱ्याचे नाव अहवालात स्पष्ट नमूद होते. मात्र, अजितदादांच्या निधनाशी संबंधित अहवालात कोणत्याही तपास अधिकाऱ्याचे नाव का नाही? कदाचित या प्रकरणात कागदपत्रांची हेराफेरी होणार आहे, हे माहिती असल्यानेच अधिकाऱ्यांनी आपले नाव दिले नसावे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, अपघातापूर्वी तिथे काही संशयास्पद लोक आले होते. त्यांनी त्या परिसराची रेकी केल्याचे बोलले जात आहे. आम्हाला याची पक्की माहिती नसली तरी, सीआयडी आणि सीबीआयने या दिशेने तपास करणे अत्यंत गरजेचे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर