ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

जलकुंभाची पाइपलाइन फुटली, 6 हजार कुटुंब सापडले अडचणीत:वल्लभनगर,आनंदनगर, गडगडेश्वरचा भाग पाण्याविना‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पार्वती नगर परिसरातील जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे आज, सोमवारचा पाणी पुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीशी सुमारे ६ हजार कुटुंब म्हणजेच २५ हजार लोकवस्ती जोडली गेली आहे. या नागरिकांना पाणी केव्हा मिळणार, हे अनिश्चित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्ती कार्य पूर्ण होऊ शकते. परंतु मध्येच आणखी काही बिघाड झाल्यास हा कालावधी अनिश्चित काळासाठी वाढूही शकतो. दरम्यान ऐनवेळी उद्भवलेल्या या बिघाडामुळे परिसरातील पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर, गडगडेश्वर आदी भागातील नागरिकांना आज पाण्याविना दिवस काढावा लागला. काहींनी संचित पाण्याचा वापर करुन दिवस घालवला, तर काहींनी पर्यायी व्यवस्थेच्या आधारे पाण्याची सोय करुन घेतली. दरम्यान मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपासूनच दुरुस्ती कार्य सुरु केले आहे. जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला जमीनीच्या आत सुमारे दीड मीटर खोल भागात ‘डक फूट बेन्ड’ असते. या ठिकाणी वरुन खाली येणारा उभा पाइप जमीनीच्या आत असलेल्या आडव्या जलवाहिनीशी जोडलेला असतो. नेमक्या याच ठिकाणी गळती सुरु झाल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे. विशेष असे की जमीनीच्या आतील ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम हे उर्वरित. पान ४ जुन्या जलवाहिनीमुळेही अडचण अमरावती आणि बडनेरा शहराला अप्पर वर्धा धरणातून (मोर्शी) पाणी पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वीच डवरगावजवळ ३० वर्षे जुनी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण शहराचा पुरवठा विस्कळीत झाला होता. त्या काळातसंपामुळे दुरुस्तीच्या कामाचा सर्वाधिक फटका पार्वतीनगर, साईनगर , गोपालनगर येथे बसला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर