ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानी विरोधात आंदोलन:अभिनव नगरातील स्थानिकांचा रोष; अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आज येथील अभिनव नगरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या अभिनव नगर या उचभ्रू वस्तीतील नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. या नागरिकांनी त्यांच्या जागेत वनसंरक्षकांच्या आदेशानुसार सुमारे २२५० चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आजचे आंदोलन पालिकेचे नगरसेवक राज सुर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. येथील नागरिकांत अनिता पाटील यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी याकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाल्याचे येथील आदिवासी बांधव व आंदोलकांचे म्हणणे आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांकडे पुरावे व दस्तऐवज आहेत. पण त्यानंतरही त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि दगडफेकीची घटना देखील घडली होती. आंदोलकांनी उद्यान परिसरात स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध घालण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वाहनांचा वापर पर्यटकांच्या सोयीसाठी केला जातो. त्यामुळे आंदोलकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. दरम्यान, अनिता पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या खात्यात आपली बदली करून घेतली, तर काहींनी त्यांच्या नोकरीला रामराम ठोकला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर