ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

भोंदू बागेश्वर महामानवांपेक्षा मोठा वाटतो का?:रोहित पवारांचा सवाल; म्हणाले – सत्तेतील मोठा पक्ष धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाचा स्पॉन्सर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे. त्यानंतरही नागपुरात या भोंदूबाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे हे लाजिरवाणे नाही का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवारही या निमित्ताने धीरेंद्र शास्त्री व त्याचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यांनी सोमवारी या प्रकरणी निशाणा साधताना पुन्हा एकदा भाजपवर आरोपाच्या फैरी झाडल्या. महामानवांच्या भूमीत भोंदूंना का बोलावायचे? रोहित पवार म्हणाले, सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे, सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून या भोंदूला पाठीशी घालण्याचं कारण काय ? महाराष्ट्राचा आधार असलेल्या महामानवांपेक्षा भोंदू धीरेंद्र शास्त्री या मोठ्या पक्षाला मोठा वाटतो का? हा मोठा पक्षच या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो, अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महामानवांची भूमी आहे, इथे बाहेरून असले भोंदू बोलवायची गरजच काय ? नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का ? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी, असे ते म्हणालेत. धीरेंद्र शास्त्रीच्या माफीनाम्यावरही संताप रोहित पवार यांनी यावेळी धीरेंद्र शास्त्रींच्या माफीनाम्यावरही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून खोटा इतिहास सांगायचा, जनतेचा रोष आला की माफी मागायची, नंतर पुन्हा जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करायची, ही एक प्रवृत्ती असून अशा प्रवृत्तींना नेहमीच आमचा विरोध आहे. भोंदू धीरेंद्र शास्त्री देखील अशीच एक प्रवृत्ती असून त्याने मागे एकदा संत तुकोबारायांचा अपमान केला, आता छत्रपतींचा तसेच महिलांचा अपमान केला. आता जनतेत रोष निर्माण झाला म्हणून ‘माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले’ असे सांगत हा भोंदू माफी मागत आहे. भोंदू धीरेंद्र जे बोलला ते जसाच्या तसे मीडियाने दाखवले आहे. भोंदू धीरेंद्र शास्त्रीने माफी मागताना त्याने केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे या भोंदूची माफी किती पोकळ आहे हे दिसून येतं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांबद्दल नेहमीच आदर आहे, परंतु संत असल्याचा आव आणत भोंदू धीरेंद्र शास्त्री सारखे पाखंडी जर इथल्या महापुरुषांच्या अपमान करणार असतील तर अशा भोंदू बाबांना संत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे “नाठाळच्या माथी हाणू काठी” याचा प्रत्यय महाराष्ट्र दाखवू शकतो हे भोंदू बाबानी विसरू नये, असे ते म्हणाले.
धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्राची कवाडे बंद करा रोहित पवारांनी शनिवारीच या प्रकरणी धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्राची कवाडे बंद करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते, “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं, असे ते म्हणाले होते. आत्ता पाहू काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री? धीरेंद्र शास्त्री आपल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे. आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले. हे ही वाचा… रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का?:1672 पूर्वी दोघांच्या भेटीचे पुरावे नाहीत, पण एका पत्रात राजे भेटीस येत असल्याचा उल्लेख बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपला राजपाठ सोपवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा रामदास स्वामी हे खरेच शिवाजी महाराजांचे गुरू होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काही इतिहासकार या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ अशी मान डोलावून देतात, तर काही ठामपणे नकार देतात. आता धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे पुन्हा एकदा या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज व समर्थ रामदासांच्या भेटीविषयी इतिहासकारांचे मतमतांतरे काय आहेत हे जाणून घेऊया… वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर