ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

खरिपाच्या तोंडावर बोगस बियाणांचे फुटले पेव‎:निर्मल सीड्सच्या विश्वास वाणाची नक्कल; बार्शीत 7.50 तर अक्कलकोटमध्ये 8.46 लाख रुपयांचे बियाणे जप्त‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अक्कलकोट कृषी विभागाने स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण एनयुएल ७ विश्वास बॅगची हुबेहूब नक्कल करून आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ४३२ बॅग व त्यांनी विक्री केलेले ४८ असे एकूण ४८० बॅग (प्रति ५ किलो) एकूण किंमत ८ लाख ४६ हजार ७२० रुपयांचे बियाणे जप्त केले. सदर बोगस बियाणे विक्रेते यांचेवर रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा, जिल्हा जळगाव या कंपनीच्या नावाने उत्पादित केलेले उडीद पिकाचे सत्यप्रत बियाणे वाण एन यु एल ७ (विश्वास) चे पॅकिंग साईज ५ किलो वजनाचे व लाट नं. टी-३४७२५४ असलेले एकूण ४८० पाकिटे असा माल रत्नाकर कोले यांच्याकडून मेमो क्रं. ३०३ दि. १५ मे २०२६ अन्वये खरेदी केला असल्याचे आढळले. त्यापैकी त्यांनी ४८ पाकिटे शेतकऱ्यांना विक्री केली होती व उर्वरित ४३२ पाकिटे साठा पथकास आढळला. याची एकूण छापील किंमत ८ लाख ४६ हजार ७२० रुपये (१९६० प्रत्येकी x ४३२ बॅग आणि उर्वरित माल मिळून) आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांचे मार्गदर्शनाखाली केली. प्रतिनिधी |बार्शी तालुका कृषी विभागाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत सुमारे ७ लाख ५२ हजार रुपये किमतीचे बनावट उडीद बियाणे जप्त केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली. जप्त केलेले सर्व बोगस बियाणे ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलिस ठाण्यात संबंधित बोगस बियाणे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व पिकांची हानी टळली आहे. मंगळवारी (दि. २६) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयास बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून कारवाई करण्यात आली. स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव (ता. परांडा) चे प्रोपरायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या उडीद पिकाच्या एनयूएल ७ ‘विश्वास’ या वाणाची हुबेहूब बनावट केलेले बियाणे विक्रीसाठी आणले होते. कृषी विभागाच्या पथकाने शहरातील स्वराज कॉलनी येथील गोडाऊनवर छापा टाकला. तपासणी दरम्यान गोडाऊनमध्ये २१६ बॅग आणि यापूर्वी विक्री केलेल्या १६८ बॅग अशा एकूण ३८४ बॅग (प्रत्येकी ५ किलो) बनावट उडीद बियाणे आढळून आले. संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी बार्शी. जप्त केलेल्या बियाण्याची एकूण किंमत ७,६२,६४० रुपये आहे. प्रति बॅग १९६० रुपये दराने हे बियाणे विकले जात होते. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी, बार्शी संतोष कोयले, , अतुल जाधव, बाळू बागल, किशोर अंधारे, गणेश पाटील उपस्थित होते. ^ बॅगवरील क्यूआर कोड स्कॅन केला असता, त्यामध्ये पीक, वाण, वर्ग, उत्पादन संस्था, तपासणी तारीख, वैधता शुद्धता, उगवण क्षमता इ. माहिती पत्रक दिसले नाही व डुप्लिकेट पॅकेट क्यूआर स्कॅन केल्यानंतर कंपनीची माहिती दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी करताना शासनाच्या साथी पोर्टलवर सदर बॅगांची नोंदणी आहे का पाहावे. चंद्रकांत मंगरुळे, तालुका कृषी अधिकारी ^बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी. संशयास्पद बियाणे आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी, अधिकृत विक्रेते: नेहमी कृषी विभागात नोंदणीकृत आणि अधिकृत परवाना असलेल्या विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करा. पक्के बिल (पावती): विक्रेत्याकडून खरेदीची पक्की पावती (बिल) घ्या. त्यावर बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर , आणि खरेदीदार शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे. बियाणे उगवले नाही, तर हे बिल कायदेशीर कारवाईसाठी मुख्य पुरावा ठरते. पाकिटाची तपासणी: बियाण्याचे पाकिट सीलबंद आहे का नाही याची खात्री करा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर