ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू करून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. याच दौऱ्याचा भाग म्हणून आज धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली, ज्यामध्ये संजय राऊत यांनी सर्वप्रथम ओमराजेंवर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल केला. गद्दाराच्या सभेला मी आलो होतो.. उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे फिरत नाही म्हणतात उद्धव ठाकरे फिरायला लागले की काय होत ते महाराष्ट्र बघतोय. या सभा नाही, या माझ्या कौटुंबिक बैठका आहेत, यांनी कितीही आमदार फोडू दे, तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी राहणार नाही. लोकसभा निवडणुकांवेळी, समोरच्यांकडून पैशांचा पाऊस पडत होता, तेव्हा या गद्दारासाठी एका शेतकऱ्याने त्याच्याकडचे पैसे निवडणुकीसाठी दिले. गद्दाराच्या सभेला मी आलो होतो तेंव्हा एक गरीब शेतकरी आला आणि म्हणाला, मला खासदारला पैसे द्यायचे आहेत. काय भाषण काय देत होता… माझा फोन नंबर घ्या म्हणायचा, मी फोन करायला लागलो तर फोन उचलायचा नाही. मग, मी कैलासला म्हणालो अरे हा तर फोन उचलत नाही, असे म्हणत ओमराजे निंबाळकरांवर ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? पुढे उद्धव ठाकरे सांगतात की, याच एक भाषण होतं, त्या भाषणात तो म्हणाला, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ म्हटलं तर आपण कोणाचं नाव घेतो. आता, तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? मी जेंव्हा याच्या प्रचारसाठी आलो होतो तेव्हा म्हणालो होतो दोन वाघ माझ्याकडे आहेत. मात्र, त्यातला हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला. उद्धव ठाकरे म्हणाले, या मिंदेसेनेला भवितव्य काय आहे? मग हे खासदार तिकडे का गेले? कारण भाजपमध्ये गटबाजी सुरू असून त्यांचं ऑपरेशन देवेंद्र सुरु आहे. काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुसऱ्या कोणाला दिली तर आश्चर्य वाटणार नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीचे स्वप्न पाहत आहेत, संघ सुद्धा पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देईल, मग माझं काय होईल यासाठी हे खासदार देवेंद्र फडणवीस यांना न देता बाजूला ठेवले. 2029 पर्यत पंतप्रधानपदाचे जे चेहरे असतील त्यांचा पत्ता कट केला जाईल, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर