ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?:मुख्यमंत्र्यांकडे मागूनही संरक्षण नाही, माझ्यासह कुटुंबाला धोका- विकास लवांडे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही संरक्षण न मिळाल्याने, सरकार आपल्या हत्येची वाट पाहत आहे का, असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला. लवांडे यांनी आपल्या अटकेबाबत माहिती दिली. शरद पवारांच्या विचारांवर भूमिका मांडल्यामुळे वाघोली पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता न्यायालयाच्या आवारातून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केली होती, असे ते म्हणाले. मात्र, न्यायालयाने तत्काळ त्यांची सुटका केली आणि जामीन मंजूर करताना पोलीस व सरकारी वकिलांनी आपली चूक मान्य केली. या खोट्या कारवाईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याचे लवांडे यांनी सांगितले. तरुण मुलांचे ब्रेनवॉश केले जाताय विकास लवांडे म्हणाले की, महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक समाजात वाद निर्माण केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आरएसएसप्रणित संघटनांमध्ये तरुण मुलांची भरती करून, त्यांचे ब्रेनवॉश केले जात आहे. मुस्लिम समाज हा शत्रू असल्याचे भासवून समाजात तेढ निर्माण केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. वारकरी संप्रदाय ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न विकास लवांडे म्हणाले की, मूळ वारकरी संप्रदाय ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत लवांडे म्हणाले की, संग्राम भंडारे हा वारकऱ्यांच्या वेशातील गुंड असून त्याच्या पाठीशी कॅबिनेट मंत्री नितेश राणे व भाजप पुरस्कृत लोक आहेत. याच लोकांनी आपल्याला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. सध्या संभाजी भिडे आणि विश्व हिंदू परिषदेशी निगडित लोकांकडून आपल्याला सातत्याने धमक्या येत आहेत. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास विकास लवांडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना दोन वेळा निवेदन देऊनही अद्याप कोणतेही संरक्षण मिळालेले नाही, असे त्यांनी नमूद केले. मात्र, आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून जीव गेला तरी महापुरुषांच्या आणि सहिष्णुतेच्या विचारांवर ठाम राहून हा लढा शेवटपर्यंत लढणार असल्याचा निर्धार विकास लवांडे यांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर