ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

घरमालक रुग्णालयात, 1461 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने लंपास:36,500 ची रोकडही पळवली, हरिद्वारनगरातील घटना‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चिखलदरा तालुक्यातील मूळ रहिवासी एका व्यक्तीच्या परतवाडा येथील हरिद्वारनगरातील घरात घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे १,४६१ ग्रॅमचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी २० जूनला उघडकीस आली. मधुकर धांडेकर यांच्या घरी ही चोरी झाली. धांडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परतवाड्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. २० जूनला सकाळी धांडेकर यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. गव्हाच्या कोठीत ठेवलेली ३६,५०० रुपयांची रोकड लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यात ९१ ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्यामध्ये सोन्याच्या बांगड्या, निंबोळी मण्यांची पोत, दोन अंगठ्या, कानातील रिंग व लटकन यांचा समावेश आहे. सुमारे १,३७० ग्रॅम चांदीचे दागिने, त्यात ५०० ग्रॅमची तगडी, १२० ग्रॅमच्या तोरड्या, ७५० ग्रॅमचे पायातील कडे यांचा समावेश आहे. एकूण १,४६१ ग्रॅमचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे ७ लाख ५,५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. नोंद पोलिसांनी केली आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे १५ लाखापर्यंत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर