ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मनपाच्या करवसुलीतील 2% वाटा आता स्मार्ट सिटीला द्यावा लागणार; स्मार्ट सेवांच्या बदल्यात कोट्यवधींचा निधी देण्याचा ठराव मंजूर

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या करवसुलीतील उत्पन्नापैकी २ टक्के रक्कम आता कायमस्वरूपी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी पाठवलेल्या मागणी पत्रावर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनीच ३ फेब्रुवारी रोजी मंजुरीचा ठराव घेतला आहे. तांत्रिक सहकार्य आणि ई-गव्हर्नन्स सेवांच्या मोबदल्यात हा निधी मागण्यात आला असून यामुळे मनपाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्मार्ट सिटीने महापालिकेच्या करवसुलीसाठी आणि नागरी सुविधांसाठी ३९ ई-गव्हर्नन्स मॉड्युल्स, व्हॉट्सॲप चॅटबॉट, बी. पी. एमएस. पेमेंट गेटवे आणि स्मार्ट नागरिक ॲप विकसित केले आहे. या प्रणालींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि भविष्यातील नवनवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे स्मार्ट सिटीने म्हटले आहे. या कामाच्या मोबदल्यात मनपाच्या एकूण करवसुलीतून २ टक्के वाटा देण्याची विनंती करण्यात आली होती, ज्यावर आयुक्त जी. श्रीकांत, नगर सचिव नंदकिशोर भोंबे, उपायुक्त विकास नवाळे आणि प्रसाद देशपांडे यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्यांनी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ४ कोटींच्या निधीची तातडीची मागणी सीईओ जी. श्रीकांत यांच्या स्वाक्षरीने ४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारे पत्र मनपाकडे सादर करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या तंत्रज्ञानामुळे करवसुलीत पारदर्शकता आणि सुलभता आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असून हा निधी देणे न्यायोचित असल्याचे ठरावात नमूद केले आहे. अॅप मनपाकडे हस्तांतरित करावे स्मार्ट सिटीचे कामे सध्या बंद आहेत. त्यांनी विकसित केलेले ॲप मनपाकडे हस्तांतरित करावेत. मनपाकडे स्वतःचा स्टाफ असताना स्मार्ट सिटीला वेगळे पैसे देण्याची गरज नाही. -राजेंद्र जंजाळ, उपमहापौर ठराव पूर्णपणे नियमबाह्य राज्यात कुठेही असा प्रकारचा ठराव झालेला नाही. हा ठराव पूर्णपणे नियमबाह्य आहे. स्मार्ट सिटीला पोसण्यापेक्षा तंत्रज्ञान मनपाकडे वर्ग करावे. आम्ही महासभेत याविरोधात आवाज उठवू आणि हा ठराव रद्द करण्यास भाग पाडू. – समीर बिल्डर, विरोधी पक्षनेते, मनपा टॅक्स कलेक्शनमध्ये मोठी वाढ स्मार्ट सिटीने विकसित केलेल्या ॲप्समुळे मनपाच्या टॅक्स कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रणालींचे सातत्य टिकवण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी आम्ही २ टक्के निधीची मागणी केली होती, जी मंजूर झाली आहे. -रवींद्र जोगदंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी – मनपावर कर्जाचा डोंगर, मग स्मार्ट लाड कशासाठी? स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमध्ये स्वतःचा हिस्सा भरण्यासाठी पालिकेने यापूर्वीच २५० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. या कर्जापोटी मनपा दरमहा ४ कोटी रुपयांहून अधिकचा हप्ता भरत आहे. एकीकडे १२०० कोटी रुपये कर्जाचा बोजा असताना दुसरीकडे वसुलीतील वाटा स्मार्ट सिटीला देण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीने विकसित केलेले ॲप्स स्वतःकडे हस्तांतरित करण्याऐवजी कोट्यवधींचा निधी देण्याचे प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर