ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

हॉटेल व्यवसाय चुलीवर:मुंबई, संभाजीनगरसह प्रमुख शहरांतील हॉटेलांत पेटल्या चुली; गॅस बुकिंगचे नंबरही बंद, तुमच्याकडे काय?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाच्या थेट झळा आता महाराष्ट्राला बसत आहेत. राज्यात जवळपास सर्वच शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातल्यामुळे हॉटेल व्यावसायिकही अडचणीत सापडलेत. पण त्यांनी या ही बिकट परिस्थितीत चूल पेटवून आपला व्यवसाय पुढे चालवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर आदी प्रमुख शहरांसह अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन व फोनद्वारे सिलिंडर बुकिंग केलेत. पण त्यांना वेळेवर डिलिव्हरी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे गॅस एजन्सींसमोर दिसणारे दृश्य गेल्या काही दिवसांत अधिकच गंभीर झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिक सकाळी एजन्सी उघडण्यापूर्वीच रांगेत उभे राहत आहेत. याचा महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. हॉटेल्स, ढाब्यांवर पेटल्या चुली दुसरीकडे, सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे व लहान खाद्यव्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे दोन-तीन दिवसांचा गॅसचा साठा होता. पण आता तो संपला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हॉटेल्स चालवणे अवघड झाले आहे. परिणामी, काही हॉटेल्सनी चुली पेटवून तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. अनेक हॉटेल्समध्ये लाकडी चुली पेटवून स्वयंपाक केला जात आहे. तर काही हॉटेल्समध्ये कोळशाच्या शेगड्यांचा वापर केला जात आहे. संभाजीनगरमध्येही पेटल्या चुली जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगर येथील महावीर चौकातील शिवगणेश हॉटेलसह अनेक हॉटेल्स उघड्यावर चुली पेटवून स्वयंपाक करत आहेत. हॉटेल मालक प्रवीण कुमार याविषी सांगतात, ही स्थिती अशीच सुरू राहिली तर आमच्यावर हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते. पुण्यातील एका हॉटेल मालकाने सांगितले की, व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे आमच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. व्यवसाय बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही चुलीवर काही पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक छोट्या खानावळींनीही अशीच व्यवस्था सुरू केली आहे. चहा, नाश्ता आणि काही मर्यादित पदार्थ कोळशाच्या शेगड्यांवर बनवले जात आहेत. चुलीवर मोठ्या प्रमाणावर जेवण बनवणे अवघड आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यूतील काही पदार्थ तात्पुरते बंद केले आहेत. ग्राहकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. काही रेस्टॉरंटमध्ये आवडीचे पदार्थ उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांवर आल्यापावली परत जावे लागत आहे. यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पुन्हा आपल्या पारंपरिक चुलींचा वापर सुरू केला आहे. बुकिंगचे नंबर बंद छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी गॅस एजन्सीसमोरच्या रांगात वाढ झालेली दिसली. रस्त्यावर अनेक ठिकाणी टू व्हिलरवर लोक रिकामा सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीकडे जाताना दिसले. कारण अनेक गॅस एजन्सीने बुकिंग फोन बंद केलेत. ज्यांनी बुकिंग केले आहे, त्यांना ते मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झालीय. उद्या स्वयंपाकच झाला नाही, तर कसे असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. त्यामुळे लोक सिलिंडर घेऊन थेट एजन्सीकडे जातायत. दुसरीकडे अनेक छोट्या-छोट्या हॉटेलांनी आपला धंदा बंद केल्याचेही दिसले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर