ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारांचा जनता दरबार:महिलांसह नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय; नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना आदेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांनी केला. या दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. विशेषतः महिलांच्या समस्या आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेशी संबंधित अडचणी सोडवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बारामती तालुक्यातील विविध गावांमधून अनेक नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आले होते. यामध्ये महिलांची संख्या विशेषतः जास्त होती. ‘लाडकी बहीण’ योजनेतील अडथळे, स्थानिक नागरी सुविधा, तसेच वैयक्तिक तक्रारी अशा विविध विषयांवर महिलांनी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट संवाद साधला. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे संयमाने ऐकून घेत त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. या जनता दरबाराच्या वेळी बारामती वकील संघटनेचे सदस्य देखील सुनेत्रा पवार यांना भेटले. त्यांनी वकिलांच्या व्यावसायिक अडचणींबाबत चर्चा केली आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न होत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची ही प्रभावी पद्धत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेतील गदेचे पूजन दरम्यान, पुण्यातील वाघोली येथे होणाऱ्या आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनीही या दरबारादरम्यान सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. स्पर्धेचे औपचारिक निमंत्रण देण्यासाठी ते बारामतीत आले होते. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली. कुस्ती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मल्लांना अशा स्पर्धांमुळे मोठे व्यासपीठ मिळते, असे मत व्यक्त करत राज्यातील कुस्ती परंपरेला पुढेही प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी आयोजकांना आश्वासन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर