ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘बाबा सरेंडर, दे सिलिंडर!:पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले, एपस्टीन फाइल्सच्या पापाचा फटका जनतेला, वडेट्टीवार-पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रत्येक छोटे हॉटेलवाले त्रस्त झाले आहेत. त्यांचे हॉटेल बंद करावे लागले आहेत. हॉस्टेलबंद पडत आहेत. लोकं 2 हजार रुपये देत गॅस सिलिंडर विकत घेत आहे. केंद्र सरकारला हे दिसत नाही का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र हे सरेंडर झाले आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सामान्य माणसांना गॅस आणि तेलासाठी ज्या समस्येला तोड द्यावे लागत आहे याचे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यावर देश चालवणे योग्य आहे का? मोदी यांच्या इस्रायलसोबत आहोत या विधानामुळे आपल्याला इराणकडून मिळणारी साथ मिळत नाही. मंत्री सांगतात कसलीही कमतरता नाही, पण सिलिंडरसाठी दोन-दोन किमी रांगा लागताना दिसत आहे. गॅस आणि पेट्रोल संदर्भात राज्याची स्थिती काय आहे यावर सरकारने बोलले पाहिजे. लोकं त्रस्त झाले आहेत, त्यावर निर्णय घेतला गेला पाहिजे. घरगुती गॅस सिलिंडर बंद व्हायला सुरूवात काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, एपस्टीन फाइल्समुळे सरेंडर झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज संपूर्ण देशात गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवला आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱे मुले-मुले ते सुद्धा जेवनाची व्यवस्था होत नाही म्हणून सगळे सोडून गावाकडे निघाले आहेत अशी परिस्थिती झाली आहे. अनेक हॉटेल्स बंद झाल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर बंद व्हायला सुरूवात झाली आहे. त्यासाठी लोकं लाईनमध्ये लागायला लागली आहेत. मुंबईतील अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल्स बंद नाना पटोले म्हणाले की, राज्य सरकार अन् केंद्र सरकार या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेला आणि इस्रायलला सरेंडर झाले आहे त्यामुळे एपस्टीन फाइल्सचा परिणाम यांच्या पापाचा परिणाम सामान्य लोाकांना भोगावा लागत आहे. मुंबई शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल्स बंद झाले आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार अजूनही झोपलेले आहे. म्हणून आम्ही सरेंडर दे सिलिंडर असे आंदोलन करत आहोत. जनतेला वाऱ्यावर सोडता येणार नाही नाना पटोले म्हणाले की, सरकारने कुणाचे हातपाय पडायचे ते पडावे, यांच्या एपस्टीन फाइल्सच्या पापामुळे जनतेला त्रास होऊ देऊ नये. जनतेला वाऱ्यावर सोडता येणार नाही ही आमची भूमिका आहे. सरकारने सिलिंडर द्यावे. बाबा सरेंडर दे सिलिंडर अशी घोषणाबाजी वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर