ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंचाने दिला आहे. आज खुलेआम वरली मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याने संपूर्ण गावाची प्रतिमा मलिन होत असल्याचा गंभीर आरोप दहीहंडा विकास मंचाने केला आहे. मंचाच्या निवेदनानुसार, दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या अवैध धंदे सुरू आहे. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. अनेक कष्टकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत. व्यसनाधीनता, गुन्हेगारी, घरगुती वाद आणि सामाजिक अस्थिरता दिवसेंदिवस वाढत आहे. असेही मंचाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी निवेदन देताना प्रा. डॉ. विजय आठवले, दीपक भांडे, निलेश जैन, किशोर सिरसाट शोभित आठवले, संजय खाडे, शत्रुघ्न आठवले, गोविंद झाडे, अजय आठवले, आदींची उपस्थिती होती. विकास मंचाच्या मागण्या {दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व वरली मटका, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री व इतर सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. { अवैध धंदे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी. { अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी. {युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध साम्राज्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. {गावात व्यसनमुक्ती, कायदा सुव्यवस्था, सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर