ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पुढील 2 दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; ‘या’ ठिकाणी जाणं टाळाच, हवामान विभागाचा इशारा

26 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : पुणे जिल्हा आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी पुढील दोन दिवसांचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पुणे शहर आणि परिसरात ३१ जुलैपर्यंत अधूनमधून उघडीप पाहायला मिळेल. मात्र ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कायम राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शहरात सलग ४ दिवसांपासून संततधार
पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे. शनिवारी सकाळी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती, मात्र दुपारनंतर पुन्हा हलक्या सरी सुरू झाल्या आणि रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला. रविवारी देखील सकाळी हलका पाऊस झाल्याने दिवसभर शहरात ढगाळ आणि आल्हाददायक वातावरण होते. रविवारी शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवार (२७ जुलै) आणि मंगळवार (२८ जुलै) रोजी तापमानात किंचित वाढ होऊ शकते, पण पावसाची रिपरिप सुरूच राहील.

सतत सुरू असलेल्या या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टेकड्या, धबधबे आणि जंगल परिसर पूर्णपणे हिरवाईने नटले आहेत. त्यामुळे विकेंडला पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, अतिउत्साहाच्या भरात पर्यटकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या अनेक घाट आणि दुर्गम भागात चिखल झाला असून रस्ते निसरडे झाले आहेत. तसेच झाडे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडताना पर्यटकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची चांगली नोंद झाली आहे. यामध्ये मुळशी तालुक्यातील गिरिवन परिसरात सर्वाधिक ३६.० मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कुरवंडे येथे २४.५ मिमी, तर माळीण भागात १५.० मिमी पाऊस पडला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर