ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मनापासून आनंद होईल:सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात एकजुटीने काम करण्याची आमदारांची इच्छा- अण्णा बनसोडे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले आहे. सुनील शेळके यांच्यानंतर आता अण्णा बनसोडे यांनी देखील विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अण्णा बनसोडे म्हणाले, शरद पवार हेत आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वांना मान्य आहे. मात्र 1999 पासून अजितदादांसोबत काम करत आलो आहे. आता सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती त्या उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद पुढे बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल. आम्ही सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आणि आता सर्व नेते आमदार यांनी इच्छा व्यक्त केली आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात. अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत कधीही चर्चा केलेली नव्हती. आता आम्हाला विश्वास आहे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही व्यवस्थित पुढे जात आहोत आणि विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय होईल. तटकरे आणि पटेल पक्षावर कब्जा करत आहेत का? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षावर कब्जा करत आहेत का, असा प्रश्न विचारला असता अण्णा बनसोडे म्हणाले, या आरोपात तथ्य नाही. तसेच सुनेत्रा पवार निर्णय घेण्यास कमी पडत आहेत का? यावर बनसोडे म्हणाले, त्यांनी आत्ताच कारभार हाती घेतला आहे. सर्वांचा विचार करून निर्णय घेतात. तसेच जय पवार यांची पत्रकार परिषद तटकरे आणि पटेल यांनी अडवली का? यावर आपल्याला काही माहीत नसल्याचे बनसोडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत:सुनील शेळकेंच्या विधानाने खळबळ; सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल, तर विलीनीकरणासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक विधान शेळके यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर