ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक:भोंदू बाबाशी सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे; विरोधी पक्षनेता न नेमणे हा सत्तेचा माज- नाना पटोले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्या भोंदू बाबासोबत सरकारमधील अनेकांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे. सरकारच्या पापाचा घडा भरला आहे, आता ते भांडे फुटायची वेळ आली आहे, यामध्ये जे राजकारण सुरू आहे. हे अवैध धंदे सुरू होते त्यावेळी पोलिस झोपले होते का? असा सवालही पटोलेंनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, भाजपकडून लोकशाहीचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी दोन्ही सभागृहात आपल्याला हवे तसे काम करता यावे म्हणून विरोधी पक्षनेता नेमला नाही.राज्यावर ज्यांचे दुरगामी परिणाम
होतील असे कायदे पारित केले गेले. त्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा असो की महसूलचा कायदा असे बरेच कायदे आणले त्यातून शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे ठरवले आहे. सर्वसामान्य जनतेला लुटायचे कायदे त्यांनी पारित केले. हे लोकशाही न मानणारे सरकार आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची हत्या झाली. रॉकेल कुणासाठी? नाना पटोले म्हणाले की, सरकार बहीनींकडून 5 हजार रुपये काढून घेतले जातात. यावर मुख्यमंत्री बोलत नाही. त्यांनी सर्व विषयावर बोलले पाहिजे. सरकारकडून लाडक्या बहिणींच्या नावाने महिलांची फसवणूक करण्यात आली. सरकारकडून महिलांचा अपमान करण्यात येत आहे. रॉकेलचे तेल 86 रुपये दराने दिले जाणार आहे. रॉकेल कुणासाठी आणले जात आहे हे स्पष्ट नाही. गॅस असणाऱ्यांना त दिले जात नाही, मग त्यासाठी कोणाला पात्र ठरवले जाईल हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. रॉकेल गरिबांसाठी देणार की श्रीमंत लोकांना देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीकडून बहिणींच्या पैशांचा केवळ इव्हेंट नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकच सरकार योजना सुरू करत असते. आम्ही सुद्धा संजय गांधी निराधार योजना सुरू केली होती. त्यामध्ये महिला, पुरुष होते पण काँग्रेसने त्यांचे पैसे देताना या आठवड्यात पैसे देतो त्या आठवड्यात पैसे देतो असे करत त्याला प्रसिद्धी दिली नाही. मात्र हे सरकार लाडकी बहीणचे पैसे या दिवशी देणार त्या दिवशी देणार असे सांगत प्रसिद्धी करते. हे पैसे काही त्यांच्या घरचे नाहीत. सत्ता आली तर 2100 रुपये देणार म्हणणारे आता सरकार येऊन सुद्धा 1500 रुपयेच देत आहे ते सुद्धा 3 महिन्यातून एकदा देत आहे. लाडक्या बहिणींना या लोकांनी धोका दिला. काँग्रेस काळातील योजना लोकांसाठीच्या होत्या. भाजप केवळ दिखावा करते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर