ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अकोल्यात लव्ह जिहादने एका बहिणीचा जीव घेतला:महिलेची हत्या करून मृतदेह जाळला; खासदार अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराची एक अत्यंत विदारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका नवविवाहितेचे अपहरण, त्यानंतर धर्मांतर आणि अखेर निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या आईवडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावरून भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही नांदखेडा (ता. मंगरुळपीर) येथील रहिवासी होती. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी तिचे लग्न वर्धा येथील एका तरुणाशी रीतसर पार पडले होते. मात्र, लग्नानंतर काही आठवड्यांतच तिच्या आयुष्याला भीषण वळण लागले. खासदार बोंडे यांच्या आरोपानुसार, पीडितेच्या गावातीलच सादिक शाह नावाचा तरुण तिला ओळखत होता. सादिक हा अकोल्यात भाड्याने खोली घेऊन राहत असे. पीडितेचे लग्न झाल्यानंतर सुमारे महिनाभराने तो वर्ध्यात पोहोचला आणि त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. अपहरण, आठ महिने अज्ञातवास आणि प्रसूतीनंतर अंत पीडितेच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, सादिक शाहने विवाहितेची दिशाभूल करून तिला सासरहून पळवून नेले. त्यानंतर सुमारे आठ महिने ते मुंबईत विविध ठिकाणी राहिले. काही काळापूर्वी ते अकोल्याला परतले, जिथे ती गर्भवती असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, २८ मार्च २०२६ रोजी पीडितेने एका बाळाला जन्म दिला. मात्र, बाळंतपणानंतर अवघ्या सहाव्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल २०२६ रोजी तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मोकळ्या मैदानात विवस्त्र आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. धर्म बदलला, छळ केला; अनिल बोंडेंची आक्रमक भूमिका खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी आरोप केला की, “पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव बदलण्यात आले. तिला मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या गेल्या आणि शेवटी तिची हत्या करण्यात आली. हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून यामध्ये सादिकच्या कुटुंबासह अनेक लोकांचा समावेश आहे.” अनिल बोंडेंच्या मागण्या काय? आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करावी. मुख्य आरोपी सादिक शाह आणि त्याच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करावी. ते ज्या ज्या ठिकाणी राहिले, त्या सर्व ठिकाणांची सखोल चौकशी व्हावी. यासह आरोपींच्या अवैध बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, अशा मागण्या खासदार अनिल बोंडे यांनी केल्या आहेत. पोलिस तपासाची सद्यस्थिती या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. “आम्ही प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. सध्या एका आरोपीला ताब्यात घेतले असून, शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल,” असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे अकोला आणि वर्धा जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर