ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’:या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या शब्दामुळे जर माझे बंधू-बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पोंक्षे यांनी आपली बाजू एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. ते म्हणाले, सध्या माझे एक वक्तव्य मीडिया फिरवत आहे. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातले मागचे पुढचे सगळे कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्य टाकत असतात. पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, माझी दोन वक्तव्य त्यांनी चालवलेली आहेत. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरे मनुस्मृती जर वाचली असती, तर ती जाळली नसती, असे मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळे आपण वाचतच नाहीये. हे जर वाचले तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमके काय म्हटले आहे. हा माझ्या मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असे म्हटले असल्याचे स्पष्टीकरण पोंक्षे यांनी दिले आहे. हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केला तसेच सगळे वेद, उपनिषद संपूर्ण भाषण युट्युबवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, हे त्यांनी स्वतः म्हटले आहे, असेही शरद पोंक्षे यांनी यावेळी म्हटले. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही शरद पोंक्षे म्हणाले, मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहे. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, कळावेत, ते कसे होते, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरु आहे. काही दिवसांनी ते तुम्हाला दिसेल. ‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’, या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो माझा मूळ हेतू आणि मूळ उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे. माझी सगळी व्याख्यानं तुम्ही ऐकू शकता, मी कधी काही लपवत नाही. माझी जास्त व्याख्यानं बहुजन समाजातीलच लोक ठेवतात. काही लोक बावळटासारख्या प्रतिक्रिया देत असतात. पण माझ्या काही चांगल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे मला असे वाटले की, एक व्हिडीओ करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. मुळात मी बाबासाहेबांचा, सगळ्या महापुरुषांचा अत्यंत आदर करणारा माणूस आहे. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो. त्यामुळे मनुस्मृतीबाबतच्या वाक्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी मनापासून माफी मागतो, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर