ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नितेश क्षीरसागर कळंब | प्रतिनिधी

कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज दि. १ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब धांदे होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरगंटवार, प्रा. निलेश दुबे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक कु. केशवी निमसटकर हिने सादर करत निरोप समारंभाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले.

मुख्याध्यापक आशिष महाजन यांनी शिक्षक-विद्यार्थी नात्याचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांपासून दूर जाताना शिक्षकांनाही तितकाच भावनिक अनुभव येतो, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब धांदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत शाळेत मिळालेली संस्कारांची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडेल, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रथमेश दरवेकर व कु. स्वरा देवघरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. दर्शना इजपाडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण देशमुख, मनोज शिवरकर, मयुर होले, कु. चंद्रभागा मेश्राम, कु. शालू सदाफळे, सौ. प्रांजली दरणे, शिवम चांदोरे व विठ्ठल राठोड यांनी परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर