ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

राष्ट्रवादीचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच राहणार यावर शिक्कामोर्तब:आज वरळी डोममध्ये निर्णायक घोषणा; पक्ष आणि सत्ता दोन्ही ताब्यात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या मोठ्या निर्णयाची आज अधिकृत होण्याची शक्यता आहे. वरळीच्या डोम येथे होणाऱ्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणूक, राज्यसभा उमेदवारी आणि संघटनात्मक फेरबदल या सगळ्या घडामोडींमुळे पक्षाच्या राजकारणाला नवा वेग मिळाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक आणि राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत इतिहास घडवला. राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी पार पडला. आता राष्ट्रीय अध्यक्षपद आणि बारामती पोटनिवडणूक या दोन्ही आघाड्यांवर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बारामतीतील लढत, राज्यसभा उमेदवारी आणि पक्ष संघटनेतील फेरबदल या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंद असलेल्या मतदारांनाच पोटनिवडणुकीत मतदान करता येणार आहे. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कधीही निवडणुकीची अधिकृत घोषणा होऊ शकते. प्रारूप यादी जाहीर होताच बारामतीत राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना सक्रिय झाली असून संभाव्य रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे. या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. सहा महिन्यांच्या संवैधानिक अटीची पूर्तता करण्यासाठी ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते. भारतीय संविधानातील कलम 164(4) नुसार मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या व्यक्तीने सहा महिन्यांच्या आत विधानमंडळाचे सदस्यत्व मिळवणे आवश्यक असते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ही अट पूर्ण करण्यासाठी बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. पक्षाने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचेही समजते. पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा ठराव दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा ठराव कोअर कमिटीच्या बैठकीत मंजूर झाला. मुंबईत प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक बदलांवरही चर्चा झाली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची तयारी सुरू असून 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. वरळी डोम येथे आयोजित अधिवेशनात सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल निश्चित झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर