ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

नांदेड गँगवॉरने हादरले, मध्यरात्री 3 जणांचा मर्डर:अगोदर टोळीच्या म्होरक्याचा मर्डर, नंतर रुग्णालयात जाऊन 2 जखमींची केली हत्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गत काही महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणारे नांदेड शहर शुक्रवारी पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरने हादरले. ताज्या घटनेत 3 जणांची निर्घृण हत्या झाली असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. दोन टोळ्यांतील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. पण रस्त्यावर झालेला हा वाद नंतर थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला आणि परिस्थिती आणखी चिघळली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात असलेल्या ई-स्वेअरलगत शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास 2 टोळ्यांत वाद झाला. त्यावेळी अरिजितसिंग चव्हाण हा धुरंधर-2 चित्रपट पाहून घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज व इतर काही हल्लेखोरांनी तलवार व खंजीरने हल्ला केला. त्यात 25 वर्षीय अरिजितसिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील व इतर एकाला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिकडे हल्लेखोरांना सरकारी दवाखान्यात दाखल केल्याची गोष्ट अरिजितसिंग चव्हाणच्या भावाला समजली. त्यानंतर त्याने तत्काळ रुग्णालयाच्या धाव घेतली. तिथे त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच हल्लकल्लोळ माजला. पोलिसांनी काय दिली माहिती? पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेतील दोन्ही टोळ्यांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एका टोळीचा सदस्य अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात आहे. तर साहिल 2 महिन्यांपूर्वीच तुरुंगाबाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली होती. दुसरीडे, मृत अरिजितसिंग चव्हाणवर तब्बल 9 गुन्हे दाखल होते. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. प्रस्तुत घटनेत अरिजितसिंग चव्हाणसह अरबाज व आवेज या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अरबाज, आवेजसह इतर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला गंभीरावस्थेत विष्णुपुरी स्थित सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अरिजितचा मृतदेहही तिथेच होता. त्यामुळे त्याचा भाऊ व वडिल तिथेच होते. त्याच्या भावाने तिथेच जखमींवर चाकू हल्ला केला. त्यात दोघेही ठार झाले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर