ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पुतळ्यांच्या आडून मराठ्यांविरुद्ध षडयंत्र?:आपल्यापासून दलित-मुस्लिम-धनगर समाज तुटता कामा नये! पुतळ्यांच्या वादामागे नेमकं कोण? जरांगे पाटील घेणार शोध!

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा समाजापासून दलित, मुस्लीम, धनगरसमाज तुटला नाही पाहिजे. मराठा समाजापासून इतर समाज तोडण्याचे कुणाचे काही षंड्यत्र आहे का हे सुद्धा मराठा समाजाने बघितले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्राण आहेत, पुतळे बसवा पण त्याच्याआडून दुसरे काही सुरू नाही ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. मनोज जरांगे म्हणाले की, वाद होतील अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारू नका. आपल्या राजांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. त्यांनी जे केले ते कुणीही करु शकलेले नाही. छत्रपती शिवराय यांचा पुतळा वाद होईल अशा ठिकाणी बसवू नये. हे काही षंड्यत्र आहे का हे पाहिले पाहिजे. षंड्यत्र झाले की झाल्या जातीय दंगली सुरू. मराठ्यापासून दलित, मुस्लीम, धनगर तुटू नये याची काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? मनोज जरांगे म्हणाले की, शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? ते लावण्यास सांगत मराठा समाजाच्या विरोधात इतर सर्व समाज करण्याचा प्रयत्न कोण करतंय का? यात मी लक्ष घालणार आहे. कारण विनाकारण दलित-मराठा वाद होत आहे. माझा समाज आणि मी यामध्ये बदनाम होत आहोत. मराठा समाज पुतळे बसवत नाहीये, आम्ही असे काही कोणाला सांगत नाही. बाहेर वेगळे मेसेज जात आहेत असे मला समजले. मराठ्याच्या अंगावर दलित, मुस्लीम, धनगर घालायचा पुतळ्याच्या आडून हे कोणी करतंय का याची माहिती घ्यावी लागेल. कोणाची प्रामाणिक इच्छा सुद्धा यामागे असू शकते. जागा विकत घेत आपण पुतळे बसवू, पण वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसवू नका. वाद मिटला ही चांगली गोष्ट मनोज जरांगे म्हणाले की, सोलापूरच्या अंजनगावमधील वाद मिटला ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्व समाजाला एकत्र ठेवले आहे.त्याच विचाराने आपण पुढे चालणं गरजेचे आहे. या गोष्टीच्या मागे कोण होते हे पोलिस शोधून काढतील आणि दोन्ही समाज तिथे एकत्र राहतील. दोन-चार लोकं वाद निर्माण करत असतात त्यामुळे सर्व समाजाने वाद वाढवायचा नसता. जर प्रकरण मिटले नसते तर तोडगा काढण्यासाठी तिथे जाणार होतो. आता तिथे जाण्याची गरज नाही. वाद नाही, तो लावला जात आहे का? हे शोधले पाहिजे. पुतळा कोणी विकला हे शोधणं गरजेचे आहे. माझ्यासोबत फोटो काढत मी त्यांच्यासोबत आहे असे म्हणत मला कोणी बदनाम करू नये.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर