ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार:गरोदर राहिल्यावर गर्भपातासाठी दबाव, विवाहित तरुणाविरुध्द हिंगोलीत गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला अन महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात न केल्यामुळे संबंध तोडणाऱ्या एका विवाहित तरुणाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 29 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा पती मागील 12 वर्षापासून बेपत्ता झाला आहे. त्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत विवाहित तरुण वैजनाथ शिंदे याने तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये सदर महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने सदर प्रकार वैजनाथ याला सांगितला. दोन महिन्याची गर्भवती राहिल्यामुळे आता माझ्याशी लग्न कर असे म्हणत तिने वैजनाथ याच्याकडे लग्नाची मागणी केली. दरम्यान, सदर महिला गर्भवती राहिल्याचे समजताच वैजनाथने त्या महिलेसोबत बोलणे टाळत होता. तु गर्भपात केला तरच तुझ्याशी लग्न करतो अन्यथा मी तुझ्याशी बोलणार नाही असे त्याने महिलेस सांगितले. मात्र महिलेने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे वैजनाथ याने तिला बोलणे बंद करून लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वैजनाथ शिंदे याच्या विरुध्द याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आता त्या विवाहित तरुणाच्या शोधासाठी एक पथक स्थापन केले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर