ब्रेकिंग न्यूज
News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क… Eknath Shinde: कुणबी जात प्रमाणपत्राचा शिंदे गटाला फटका! जातप्रमाणपत्र बोगस आढळल्यानं नगरसेविकेची निवड रद… मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!
SP News Maregaon

बिल्डर सुशील रहेजाला VBA ने शिकवला धडा:मराठी तरुणास मारहाण केल्याप्रकरणी फोडले ऑफिस, बिल्डरवर अक्षरशः पळून जाण्याची वेळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने एका मराठी तरुणास जातीवाच शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या सुशील रहेजा नामक बिल्डरला चांगलाच धडा शिकवला आहे. वंचितच्या महिला कार्यकर्त्यांनी या बिल्डरच्या कार्यालयावर धाव घेत त्याचे कार्यालय फोडले. या घटनेमुळे रहेजावर अक्षरशः पळून जाण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्याच्याकडे कामास असलेल्या राहुल जाधव या बौद्ध तरुणास क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर त्याला मारहाण केली होती. यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला होता. रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा पोलिसांनी आरोपी रहेजा बिल्डरला अद्याप अटक केली नाही. यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचितच्या महिला कार्यकर्त्यांनी ऑफिस फोडले सुशील रहेजा शनिवारी त्याच्या चेंबूर येथील ऑफिसमध्ये होते. ही गोष्ट समजल्यावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई यांनी त्याच्या ऑफिसमध्ये धाव घेतली होती. ते तिथे पोहोचताच रहेजाने आपल्या कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाचे ऑफिस फोडले. तुम घाटी, जय भीम वाले लोग… पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजाकडे कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली. केवळ इतक्यावरच न थांबता, “तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” असे वादग्रस्त आणि जातीवाचक शब्द वापरून त्याचा अपमान केला व स्टाफ समोरच मारहाण केली होती. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. मनसेनेही न्याय करण्याचा दिला होता इशारा मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे. आता पाहूया आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण, या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत! असा इशारा काळेंनी दिला आहे. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच, असा इशाराही गजानन काळे यांनी या प्रकरणी दिला आहे. हे ही वाचा… राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावे हे अजित पवारांचे स्वप्न होते:आमच्या पुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा
अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्या पुढेच झाली होती, असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत हे अजित पवारांचे स्वप्न होते. आमच्यापुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात पडल्याचा दावा केला जात असताना सयाजी शिंदे यांनी हे विधान केले आहे हे विशेष. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर