ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव:राज्य शासनाचा निर्णय; परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्‍याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता आणि पीकपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्‍यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिलह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. स्थानिक लोकभावनेचा सन्मान सहकार क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांच्या विकासाला गती दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात भरीव योगदान दिले. स्थानिक पातळीवर लोकसंपर्क व विकासकामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचाच वारसा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चालवताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरमोडी धरण प्रकल्पच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर