ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बीड हादरले!:अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला गेम, कार्यक्रम ओकेच्या मेसेजने गेले पकडल्या

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षींय पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 27 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघातानंतर प्रियकराने काम फत्ते झाल्याचा निरोप दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 1 जून रोजी लिंबागणेश ते अंजनवती रस्त्यावर 27 वर्षीय किरण बंडू सोनवणे या तरुणाचा मृतदेह एका दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला होता. किरणची अपघाती मृत्यू झाला असे सर्वांना वाटले. पण शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर गळ्यावर आवळल्याचे व्रण आढळून आले होते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि संशयास्पद फोन कॉल्सचा माग काढत पोलिसांनी थेट मृत किरणची पत्नी प्रियांका सोनवणे (वय 25), तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांना बेड्या ठोकल्या. 7 वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह बीडमध्ये 7 वर्षांपूर्वी प्रियांका आणि किरण सोनवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर किरणला दारुचे व्यसन लागले. तो प्रियांकाला दारुच्या नशेत मारहाण करू लागला. यातच प्रियांकाची ओळख दशरथ परदेशी सोबत झाली. या ओळखीचे प्रेमात रुपातंर झाले. प्रियांका आणि दशरत यांच्या अनैतिक संबंधात किरण अडथळा ठरू लागला होता. यातून प्रियांका आणि दशरत दोघांनी मिळून किरणचा काटा काढण्याचा कट रचला. यात दशरतचा मित्र धीरजला सोबत घेतले. या दोघांनी किरणला निर्जन स्थळी नेत त्याचा गटा दाबून खून केला, आणि अपघाताचा बनाव रचण्यासाठी त्याचा मृतदेह रस्त्याशेजारी दुचाकीखाली दाबून ठेवला. यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपी धीरजने स्वतःच्या गाडीतून किरणचा मृतदेह रुग्णालयात नेण्याची नाटकबाजी केली, तर प्रियांका घरात बसून रडण्याचे ढोंग करत होती. मात्र खून केल्यानंतर दशरतने प्रियंकाला कार्यक्रम ओके झाल्याचे फोन करत सांगितल्याचे पोलिस तपासात समोर आले. आरोपींना 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी या खळबळजनक प्रकरणात आता मयताच्या पत्नीचा थेट सहभाग उघड झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी प्रियांका सोनवणेसह इतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, खुनामागील संपूर्ण षडयंत्र, इतर संशयितांची भूमिका आणि गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे शोधण्यासाठी न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर