ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

धनंजय मुंडेंना मंत्री केले, तर सत्ता जाणार:करुणा मुंडेंचा महायुतीला इशारा; ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी, एकनाथ शिंदेंना टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचेही जोर देऊन सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. करुणा मुंडे शर्मा या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी महायुतीला उपरोक्त इशारा दिला. त्या म्हणाल्या, वंजारी समाजाने आमदार धनंजय मुंडे यांना नाकारले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्यांना मंत्री करणाऱ्या पक्षाची सत्ता जाईल. त्यानंतर तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही. हा एका स्त्रीचा शब्द आहे. धनंजय यांनी स्वतःच्या बायकोला तुरुंगात डांबले. अनेक लोकांना जेलमध्ये टाकले. अशा 1000 लोकांची माझ्याकडे यादी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना पुन्हा मंत्री केले तर मी मंत्रालयापुढे आंदोलन करेन. अजित पवारांना न्याय देण्यासाठी पोटनिवडणुकीत उडी करुणा मुंडे यांनी यावेळी आपण बारामतीची पोटनिवडणूक का लढवत आहोत? हे ही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी बारामतीची पोटनिवडणूक अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे. कारण, अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. या महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय मिळाला नाही, मग सर्वसामान्यांचे काय? एवढे दिवस झाले, पण हा घात होता अपघात हा मुद्दा कुणीही उचलला नाही. काँग्रेसने या निवडणुकीत आपला डमी उमेदवार उभा केला. नंतर माघार घेतली. मलाही खूप काही ऑफर आल्या. अनेक नेत्यांचे फोन आले. खासदार पार्थ पवार यांचाही फोन आला. पण मी माघार घेतली नाही. माझा विजय झाला तर सर्वप्रथम मी अजित पवारांच्या अपघाताचा एफआयआर दाखल करण्यासाठी लढा देईन. महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय भेटणार नसेल, तर कुणाला भेटणार? असे करुणा म्हणाल्या. ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी करुणा मुंडे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडे काम घेऊन गेले की, ते दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर निघून जातात. त्यामुळे जनतेने मला संधी दिली, तर मी त्या संधीचे 100 टक्के सोने करेल. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप व ट्रिपल इंजिन सरकार केवळ धूर काढणारे इंजिन आहे. हे सरकार लोकांना ईडी, सीडी व कुठेतरी अडकवण्याची भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करते. ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी आहे. रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईवरही भाष्य या लोकांनी रवींद्र वायकर यांच्या घरी ईडी पाठवली होती. मध्यरात्री 2 वाजेपासून ईडीचे लोक त्यांना त्रास देत होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने मला ही गोष्ट सांगितली. रवींद्र वायकर यांनी मला घेऊन चला, पण मी शिवसेना सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. ईडीचे लोक रवींद्र वायकर यांच्या पत्नीलाही घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, असे करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या. दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या टोळीला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करुणा मुंडे यांनी यावेळी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर