ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ठाकरे गटाच्या खासदारांसोबत बैठकच झाली नाही:एकनाथ शिंदेंनी टाकला चर्चेवर पडदा; बातम्या निराधार, खोडसाळ असल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उबाठाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उबाठा गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, खासदारांच्या कथित बंडाच्या वावड्या केवळ ‘राजकीय स्टंट’ असल्याचे समोर आले आहे. नेमके शिंदेंची पोस्ट काय? एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे. उबाठाकडून लोकप्रतिनिधींची बदनामी?- म्हस्के अशा पद्धतीची कुठलीही बैठक झालेली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार आमच्याकडे घेण्याची काही गरज वाटत नाही. त्यांच्यामध्ये काही नाराजी असेल तर आमदार-खासदारांची बदनामी करणे उबाठाच्या नेत्यांनी करू नये. तुमच्यासोबत असलेल्या लोकांची बदनामी करण्याचे काम उबाठाच्या नेत्यांनी करू नये, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के म्हणाले की,दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार एकत्र असतात. आपल्या राज्यातील मंत्र्यांने चहा पानाला बोलावले तर जातात. प्रतापराव जाधवांकडे जेवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा खासदार होते. त्यामुळे काहीही बातम्या पसरू नये. अरविंद सावंत यांचे पक्षातील विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावे. उबाठातीलच काही लोकं या अफवा पसरवत लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर