ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ड्रग्ज माफियांना आता कोणीही वाचवू शकणार नाही:फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू, खरात प्रकरणी पुरावे द्या, तपास भरकटवू नका- बावनकुळे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य सरकार ड्रग्ज आणि अवैध धंद्यांच्या विरोधात अत्यंत संवेदनशील असून, दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मागील सरकारच्या काळात अशा कारवायांकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशोक खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सभागृहात या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांच्याकडे या संदर्भात ठोस पुरावे आहेत, त्यांनी ते खुशाल प्रशासनाकडे द्यावेत, सरकार त्यावर कारवाई करण्यास समर्थ आहे. मात्र, पुरावे न देता केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि तपास भरकटवण्यासाठी काही नेत्यांकडून चुकीची विधाने केली जात आहेत. अशा लोकप्रतिनिधींनी बेजबाबदारपणे न बोलता माहिती असल्यास ती थेट एसआयटी (SIT) कडे सोपवावी, असे आवाहन बावनकुळेंनी केले. नाशिक प्रकरणावर सरकारचे लक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये समोर आलेल्या ‘कार्पोरेट जिहाद’ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या कंपनीत हा प्रकार घडला, त्या कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणावर सरकारचे बारीक लक्ष असून दोषींची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू; महसूल मंत्र्यांचा कडक इशारा दुसरीकडे नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर