ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी:’आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान’, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा सध्या केली जात आहे. यात भाजपने प्रज्ञा सातव यांच्यासह 6 नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून केली जात होती. मात्र शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले. यात सुषमा अंधारे यांचे देखील नाव आघाडीवर होते, मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही. यावर अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले नातेच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे त्यांनी पोस्टमधून सूचित केले आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपने 6 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीसह सत्ताधारी शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना पुन्हा एकदा संधी देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या जागेसाठी सुषमा अंधारे यांचे नाव शर्यतीत होते आणि त्यांच्या ‘मातोश्री’वरील नुकत्याच झालेल्या भेटीमुळे त्यांच्या उमेदवारीची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अखेर ठाकरेंनी दानवेंच्या अनुभवावर विश्वास दाखवला. या राजकीय घडामोडीनंतर सुषमा अंधारे यांनीही मोठ्या मनाने या निर्णयाचे स्वागत करत एका ओळीत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असून, या निर्णयावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी कमालीचे नाराज असल्याचे समजते. या नाराजीतूनच आता काँग्रेस विधान परिषदेसाठी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असून, त्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून, पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर लवकरच उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर