ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा स्वतःची वाढवा…:शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘पक्षफोडी’वर बोचरी टीका

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ च्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “त्यांना आता तेवढंच करायचं राहिलं आहे—दुसरे पक्ष फोडायचे! दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं होती, कुठे गेली ती आता? त्यांनी आता फक्त दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला. तुमच्या पक्षातील मुलांना मोठे करा “तिथे बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथे उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्यापेक्षा आम्ही जसं आमचा पक्ष फुटल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो, तसं तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना. तुमच्या पक्षात जी चांगली मुलं काम करतायत, त्यांना मोठं करा,” असा खोचक सल्ला शर्मिला ठाकरे यांनी भाजपला दिला. चिपी विमानतळ आणि जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीवर सवाल केवळ राजकीय टीका न करता, शर्मिला ठाकरे यांनी कोकणातील ‘चिपी विमानतळाच्या’ सद्यस्थितीकडे आणि महागाईकडेही लक्ष वेधले. “पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेलं आहे. ज्या समस्यांसाठी भाजप १२ वर्षांपूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता, त्याबद्दल आज कुणी चकार शब्दही बोलायला तयार नाही,” असे त्यांनी म्हटले. विमानतळांची अवस्था आणि टॅक्सचा पैसा चिपी विमानतळाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की, “माझ्याकडे काल कोकणातील एक मराठी ज्वेलर्स आले होते, त्यांनी सांगितले की सिंधुदुर्गचे चिपी एअरपोर्ट बंद झाले आहे. चीपीची सगळी विमाने फुल जात होती, तरीही ते बंद का केले? गोव्याचे टुरिझम कमी झाले म्हणून? मग हे एअरपोर्ट बांधता कशाला? नवी मुंबई, पुणे, पुरंदर… एका एअरपोर्टसाठी ५० हजार कोटी खर्च येतो. हे पैसे आपल्या टॅक्सचे आहेत. मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातील किती बंद पडले, याची माहिती पत्रकारांनी काढून आवाज उठवला पाहिजे.” “तुम्ही मरा इकडे सगळे…”; पर्यावरण आणि पाण्याच्या प्रश्नावर संताप राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या वृक्षवाटपाच्या उपक्रमाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. “ही नवीन झाडं वाढायला १०० वर्षे लागतात. आम्ही झाडे लावू, पण तुम्ही जी झाडे तोडत आहात, ती १००-२०० वर्षे जुनी आहेत. आपल्याला लागणारा ऑक्सिजन याच झाडांकडून मिळतो. आज पावसाला उशीर झालाय, जमिनीतील पाण्याची पातळी पार तळाला पोहोचली आहे, पण कोणाला काहीही पडलेली नाही. ‘आम्हाला आमचे पैसे कमवायचे आहेत, आमची मुले परदेशात जाऊन सेटल झाली आहेत, तुम्ही मरा इकडे सगळे’ अशीच या लोकांची वृत्ती झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर