ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जावई अशोक खरातला शिक्षा नको, पण आता वाचवणार कोण?:कल्पना कुठे माहिती नाही; मुलांसाठी मी इथे आले- पार्वती शिंदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातला एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणात पोलिस त्याची पुन्हा कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खरातची सासू पार्वती शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्वती शिंदे म्हणाल्या, मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही. अशोक खरात काय करायचा माहीत नाही. अधिकारी कुटुंबीयांसोबत चौकशी करत आहेत. माझी चौकशी झाली नाही. मला काहीच माहिती नाही. मी शिक्षित नाही, मला नीट बोलताही येत नाही. अशोक खरातने केलेल्या कारनाम्यावर प्रश्न विचारला असता पार्वती शिंदे म्हणाल्या, तो जात होता, त्याच्या ऑफिसमध्ये तिकडे जाऊन काय करायचा माहिती नाही. मला आणि कल्पनाला काहीच माहिती नव्हते. तसेच त्याला शिक्षा व्हायला पाहिजे का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, शिक्षा नाही व्हायला पाहिजे, पण आता त्याला कोण सोडवणार? असेही त्यांनी म्हटले. शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेली भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असून, तिचा शोध घेण्यासाठी आता तपास यंत्रणांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. पोलिसांनी कल्पनाच्या माहेरी, नातेवाईकांकडे, नाशिकमधील मैत्रिणींकडे आणि तिच्या घरी काम करणाऱ्या आजी-माजी नोकरांकडेही सखोल चौकशी केली आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती न लागल्याने पोलीस पथकाकडून तिचा कसून शोध सुरूच आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर