ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

लेन्सकार्ट वाद:भाजप नेत्या नाझिया खान संतप्त; शोरूम मॅनेजरला धारेवर धरत विचारला जाब, कर्मचाऱ्यांना लावला टिळा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या आपल्या एका धोरणामुळे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांनी एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन या धोरणाचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी स्टोअर मॅनेजरला धारेवर धरत कर्मचाऱ्यांना टिळा लावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, ‘बॉयकॉट लेन्सकार्ट’चा ट्रेंड सुरू झाला आहे. लेन्सकार्ट कंपनीची एक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) सोशल मीडियावर लीक झाली आहेत. या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना कामावर असताना कपाळावर टिळा लावणे, बिंदी लावणे किंवा जनेऊ परिधान करण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, विवाहित हिंदू महिलांना अत्यंत कमी प्रमाणात सिंदूर लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही समोर आले आहे. दुसरीकडे, याच नियमावलीत हिजाब आणि पगडी (काळ्या रंगाची) घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. एका विशिष्ट धर्माच्या चिन्हांना लक्ष्य करून हिंदू रीतिरिवाजांवर बंदी घातल्याचा आरोप करत नाझिया खान यांनी आक्रमक पवित्रा घेतला. व्हिडिओत नेमके काय? नाझिया खान यांनी लेन्सकार्ट स्टोअरमध्ये गेल्यानंतर स्टोअर हेडला बोलावले आणि त्याचे नाव विचारले. त्यावर स्टोअर हेडने त्याचे नाव मोहसिन खान सांगितले. नाव ऐकताच नाझिया खान चांगल्याच संतापल्या. मोहसिन खान आहात म्हणून टिळा लावायला बंदी घातली का? असा सवाल करत, आपल्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना मोहसिन खानला टिळा लावण्यास सांगितले. नाझिया खान म्हणाल्या, लेन्सकार्टचे नोटिफिकेशन निघालेले आहे. त्यात स्पष्ट लिहिले की, लेन्सकार्टमध्ये काम करणारा कर्मचारी टिळा, जाणवे, तुळशीमाळ, रुद्राक्ष वापरण्यास मनाई केलेली आहे. मात्र, हिजाब वापरण्यास परवानगी आहे. याचा काय अर्थ समाजायचा? भारत देशात शरिया लागू करायचा आहे का? मुस्लिमांनी तर पाकिस्तान घेतला, आता इथे का छाती बडवली जात आहे. तू मोहसिन खान असल्यामुळे सर्वांना मोहसिन खान बनवणार आहात का? असा सवाल केला. स्टोअरमध्येच कर्मचाऱ्यांना लावला टिळा यानंतर नाझिया खान यांनी स्टोअरमधील कर्मचाऱ्यांच्या कपाळावर भगवा टिळा लावला. यावेळी नाझिया खान यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणाही दिल्या. “हिंदू रीतिरिवाजांचे दमन करणाऱ्या धोरणांना आम्ही खपवून घेणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, नाझिया खान यांनी लेन्सकार्टच्या कोणत्या शोरूममध्ये निदर्शन केले हे समजू शकले नाही. लेन्सकार्टच्या मालकाच्या अटकेची मागणी नाझिया खान यांनी केवळ स्टोअरमध्येच विरोध केला नाही, तर सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कंपनीने मुद्दाम एका विशिष्ट धर्माचा मॅनेजर नियुक्त करून हिंदू कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. नी या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय आणि NIA, NSG सारख्या यंत्रणांना टॅग केले आहे. कंपनीच्या अंतर्गत धोरणांची आणि कथित दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांची चौकशी करून मालकाला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’चा ट्रेंड या वादाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू संघटना आणि सामान्य नागरिकांनी लेन्सकार्टवर जोरदार टीका केली आहे. “धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या कंपन्यांना धडा शिकवा,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, अद्याप ही घटना नेमक्या कोणत्या स्टोअरमधील आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. लेन्सकार्टची भूमिका काय? या संपूर्ण वादावर आणि व्हायरल व्हिडिओवर लेन्सकार्ट कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. कंपनीच्या मौनामुळे सोशल मीडियावरील संताप अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर