ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

45 हजार सभासद ‘अ’ वर्ग होणार:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत ऐतिहासिक निर्णय

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अशी माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, प्रवीण पाटील (वासू पाटील), सहखजिनदार शरद चव्हाण, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, सुभाष नकाशे, राज काझी, वर्षा उसगावकर, अजित शिरोळे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे आदी संचालक उपस्थित होते. राजेभोसले यांनी सांगितले की, 2015 पासून सदस्य असलेल्या आणि किमान तीन वर्षे सक्रिय काम केलेल्या ‘ब’ वर्ग सभासदांना ‘अ’ वर्ग सभासद म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 45 हजार सभासदांना लाभ होणार आहे. मराठी चित्रपट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिले मराठी चित्रपट संमेलन’ फेब्रुवारी 2027 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणांचा विचार सुरू आहे. तसेच, चित्रपट क्षेत्रातील सुमारे 60 हजार कलाकार व तंत्रज्ञांचा पुढील तीन महिन्यांत आरोग्य विमा उतरवण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. सर्व सदस्यांचे डिजिटलायझेशन करून त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, मुंबई व पुणे येथे महामंडळाचे स्वतःचे गेस्ट हाऊस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेनर थिएटरची संकल्पनाही राबविण्यात येणार असून, राज्यभर नवीन शाखा व संपर्क कार्यालये सुरू केली जातील. चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी 2025 च्या वेतन कराराच्या धर्तीवर 20 टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालिकेतील कलाकारांना सध्या 90 दिवसांनंतर मानधन मिळते, ते दर महिन्याला मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वृद्ध कलाकारांच्या सन्मानासाठी विशेष मानधन योजना राबविण्यात येणार आहे. ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा आराखडा तयार केला जाईल, जो सीएसआर निधीच्या माध्यमातून उभारण्याचा मानस आहे. महामंडळाचे 17 संचालक राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकत्व स्वीकारतील. प्रत्येक जिल्ह्यातील कलाकार व तंत्रज्ञांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. पुण्यात स्वतंत्र चित्रनगरी उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्पष्ट केले. भविष्यात महामंडळाचे सभासदत्व पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून संपूर्ण प्रणालीचे डिजिटायझेशन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर