ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कुटुंबासह उपोषणाची घेतली धास्ती:तहसीलदार पोहोचले पाहणीसाठी, रामटेके यांचे उपोषण मागे‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोर्शी तालुक्यातील खोपडा शेत शिवारातील पाणंद रस्त्यामधून नाली काढून सिमेंट पाईप टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होणार होते. त्यासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी आज, मंगळवारी १६ जूनपासून सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची धास्ती घेऊन तहसीलदार सागर ढवळे यांनी आज मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली. परिणामी रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषण तूर्त मागे घेतले आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खोपडा ते लाडकी पाणंद रस्त्याचे काम सुरू होते. सदर रस्त्यामध्ये कोणतीही शासकीय परवानगी न घेता रामटेके यांच्या शेजारील शेतकऱ्याने ठेकेदाराशी संगनमत करून शिवरस्त्यामधून नाली काढली. या नाल्यामुळे नरेंद्र रामटेके यांचे शेतात पाणी गेले. परिणामी रामटेके यांनी गतवर्षी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने शिरखेडचे मंडळ अधिकारी यांनी स्थळ निरीक्षण करून शेजारील शेतकऱ्याने रस्त्याचे बेकायदेशीर खोदकाम करून व पाईप टाकून नरेंद्र रामटेके यांच्या शेतात पाणी सोडल्याचे स्पष्ट अहवालात नमूद केले होते. रामटेके यांनी आपल्या मुलाबाळासह उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. परंतु महसूल प्रशासनाने या गंभीर समस्येची धास्ती घेऊन तहसीलदार सागर ढवळे यांनी संबंधित कंत्राटदाराला आदेश देऊन पायलीपासून खाली तीन फुटाची खणती करून दोन्ही बाजूला दोनशे फुटापर्यंत नाली काढून जमा होणारे पाणी नाल्याच्या मार्गाने सोडण्यात यावे, असे आदेश दिले. परिणामी रामटेके यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर