ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मुंबई विभागीय बोर्डाचे अध्यक्षांनी मागितले कमिशन:22 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना एसीबीकडून रंगेहाथ अटक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय 55) यांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी देण्यात आले होते. या कंत्राटांतर्गत नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या चार महिन्यांचे सुमारे 3.16 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी 7 टक्के कमिशन म्हणून 22,176 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. ही लाचेची मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या मध्यस्थीने करण्यात आली होती. 25 मार्च रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची 6 एप्रिल रोजी पडताळणी केल्यानंतर, 7 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे त्यांच्याच केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचखोरीच्या या थेट कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लाच प्रकरणात अडकलेल्या याच राजेंद्र आहिरे यांनी फेब्रुवारी महिन्यात निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासह 19 जणांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अलिबाग आणि खोपोली येथील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला होता. यापूर्वीच्या तक्रारीत आहिरे यांनी 2018 पासून सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या सरकारी वेतन अनुदानाचा अपहार झाल्याचा गंभीर दावा केला होता. मात्र आता ते स्वतःच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागात मोठी चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कोण आहेत राजेंद्र अहिरे? राजेंद्र अहिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असून, त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात मुंबई विभागात शिक्षण निरीक्षक म्हणून केली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी राज्य मंडळाच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर