ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

रितेश-जिनेलियाच्या ‘राजा शिवाजी’ची सर्वत्र चर्चा:मुलगा राहिल देशमुखही झळकणार पडद्यावर, चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रितेश देशमुख आणि जिनेलिया यांचा ‘राजा शिवाजी’ हा आगामी चित्रपट अनेक अर्थांनी खास असून, यामध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारण्यासोबतच स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची धुराही सांभाळली आहे. या चित्रपटात जिनेलिया महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांचे कौटुंबिक महत्त्व वाढवणारी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाद्वारे त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख सिनेसृष्टीत आपले पदार्पण करत आहे. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय ठरलेल्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, टीझरपासूनच प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, तगडी स्टारकास्ट आणि प्रभावी संवादांमुळे या ट्रेलरला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ट्रेलरमधील भव्यता पाहून प्रेक्षक आता हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कमालीचे आतुर झाले आहेत. मुंबईत ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉंचिंग झाले. या सोहळ्यात अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. रितेश देशमुखने या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन केले असून त्यानेच यात मुख्य शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. तर बाळ शिवाजीच्या भूमिकेत त्याचा मुलगा राहिल देशमुख दिसणार आहे. तसेच सईबाईंच्या भूमिकेत जेनेलिया दिसणार आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमात रितेश देशमुख म्हणाला, जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतो, तेव्हा त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची आणि महानतेची व्याप्ती शब्दांत मांडणे खरोखरेच कठीण होते. त्यांच्याबद्दलचा आपला आदर, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करताना ते नेहमीच मनाच्या गाभाऱ्यातून उमटते. गेल्या दहा वर्षांपासून मी ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा साकार करण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर 2023 मध्ये जेव्हा आम्ही या प्रवासाची सुरुवात केली, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. जणू खुद्द महाराजच सांगत होते, “आता तुझी वेळ आली आहे…” कारण केवळ स्वप्न पाहून गोष्टी साकार होत नाहीत, त्यांना वास्तवात आणण्यासाठी भक्कम पाठिंबा आणि विश्वासाची गरज असते. पुढे बोलताना रितेश देशमुख म्हणाल, ‘जिओ स्टुडिओज’ आणि ज्योती देशपांडे यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ते धाडस दाखवले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही जे स्वप्न पाहिले होते, त्याचा मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. एक संपूर्ण टीम म्हणून, आम्ही हा चित्रपट महाराजांच्या चरणी एक विनम्र अर्पण म्हणून सादर करत आहोत, अशा भावना रितेशने व्यक्त केल्या. यावेळी रितेश देशमुख बोलत असताना जेनेलिया भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर