ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का?:राज्यातील सर्व कार्यालयांचे होणार ‘विशेष ऑडिट’, 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘पॉश’ (PoSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या अंतर्गत समितीचे (Internal Committee – IC) ‘विशेष ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून, ३० दिवसांच्या आत ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि निरीक्षणांनुसार, अनेक कार्यालयांमध्ये अद्याप अंतर्गत समितीची (IC) रचनाच झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी समित्या आहेत, त्या नियमितपणे कार्यरत नाहीत, वार्षिक अहवाल वेळेवर सादर केले जात नाहीत, तसेच समितीने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ‘पॉश’ कायद्याविषयी पुरेशी जनजागृती आणि प्रशिक्षण झाले नसल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑडिटमध्ये ‘या’ बाबींची होणार तपासणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणाऱ्या या विशेष ऑडिटमध्ये खालील प्रमुख मुद्द्यांची पडताळणी केली जाणार आहे:
दिरंगाई केल्यास कारवाईचा बडगा ज्या कार्यालयांमध्ये समिती स्थापन झालेली नाही किंवा अपूर्ण आहे, तिथे तात्काळ समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘पॉश’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळावे, हा या विशेष ऑडिटचा मुख्य उद्देश असून सर्व यंत्रणांनी याचे काटेकोर पालन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर