ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उत्तम आरोग्य हिच संपत्ती- आयुक्त नयना गुंडे:आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने क्रीडा संकुल येथे योग दिन उत्साहात‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती उत्तम आरोग्य हे संपत्तीपेक्षा कमी नाही आणि ते मिळवण्याचा योग हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले. केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय, दिल्ली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने रविवार २१ जून रोजी विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडोअर हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या मुख्य अतिथी म्हणून गुंडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थित सर्वांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात विभागीय आयुक्त गुंडे, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे उपसंचालक गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी राजू वडते, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे या मान्यवरांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “निरोगी वृद्धत्वासाठी योग’ आणि घोषवाक्य “योग करा निरोगी रहा आणि आनंदी आयुष्य जगा’ असे आहे. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पोलिस विभाग, जिल्हा होमगार्ड, स्काऊट गाईड, पतंजली योग समिती, श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिविंग, विविध योग व क्रीडा संघटना, विविध शाळा-महाविद्यालयांच् या शेकडो युवक, युवती, विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी सकाळी ७ ते ८ या कालावधीत उत्साहाने सहभाग घेतला. सूत्रसंचालन सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर