ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

‘मिशन कर्मयोगी 2026’मध्ये महाराष्ट्राचा डंका:6 लाखांहून अधिक AI प्रमाणपत्रांसह देशात अव्वल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्याच्या उद्देशाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा हा उपक्रम शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. याद्वारे प्रशासकीय कामात आधुनिकता आणि गतिमानता आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या साधना सप्ताहात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला असून मिशन कर्मयोगीमध्ये नवा मानदंड ठरला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये सहभागी टीम महाराष्ट्रातील प्रत्येक सदस्याच्या परिश्रमांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पाठवलेले अभिनंदनपत्र हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या राज्याने iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर 46,94,597 अभ्यासक्रम पूर्ण केले असून 6,59,759 एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबतच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शनासाठी फडणवीसांनी आभार मानले आहेत. तर या मिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदनही त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटले की, संपूर्ण भारतातील शासकीय सेवकांना एकत्र आणणाऱ्या साधना सप्ताह या आठवडाभर चालणाऱ्या अध्ययन सप्ताहाच्या निमित्ताने मी तुम्हा प्रत्येकाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. कर्मयोगी साधना सप्ताहात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. साधना सप्ताह 2026 मध्ये सहभागींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून या सप्ताहादरम्यान आपण सर्वांनी तसेच देशभरातील सुमारे 33.4 लाख कर्मचाऱ्यांनी ‘आय-गॉट (iGOT) कर्मयोगी’ मंचावर सुमारे 4 तासांचा अध्ययन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, यावरुनच सातत्यपूर्ण ज्ञानोपासना आणि उत्तम सार्वजनिक सेवा वितरण यामधील तुमची वचनबद्धता दिसून येते, असे मोदी यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर