ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा विजयी:सिद्धांत शिरसाट देखील आघाडीवर; गुलमंडीतून ठाकरे गटाचे सचिन खैरे विजयी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल वेगाने हाती येत आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांचा विजय झाला आहे. शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटही आघाडीवर आहे. संभाजीनगरात सध्या भाजप सर्वाधिक जागा जिंकून आघाडीवर असून, शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपचे 97, शिदे गटाचे 92, ठाकरे गटाचे 97, काँग्रेसचे 77, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 77 व एमआयएमचे 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हा प्रभाग क्रमांक 29 अ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा सामना भाजपचे भगवान गायकवाड व ठाकरे गटाच्या किशोर साबळे यांच्याशी आहे. हर्षदा शिरसाट यांचा विजय दुसरीकडे, हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक 18 अ मधून महापालिकेच्या रणांगणात होत्या. त्यांचा सामना भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होता. विशेष म्हणजे सिद्धांत शिरसाट हे यापूर्वी महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. पण हर्षदा यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. त्यात हर्षदा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड देत विजय मिळवला. यामुळे शिरसाट यांना मोठा दिलासा मिळाला. गुलमंडीत सचिन खैरे यांचा विजय दुसरीकडे, संभाजीनगरची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी प्रभागात (15 अ) ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा विजय झाला आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांचा विजय झाला. हा प्रभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील ठाकरे गटाचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे ठाकरे गटाची काहीशी धाकधूक वाढली होती. पण अखेर सचिन खैरे यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारत बाजी मारली. रशीद मामूंचे काय होणार? उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वॉर्डातून नगरसेवक व आरक्षणामुळे महापौरपदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाने त्यांना प्रभाग क्रमांक 4 ब मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत MIM च्या खान अमीर अनवर यांच्याशी आहे. रशीद मामूंच्या उमेदवारीला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला होता. प्रचारासाठी जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आज सुरू असलेल्या मतमोजणीत रशीद मामू आघाडीवर आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर