ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नारायण राणेंची प्रकृती बिघडली:चिपळूनमधील कृषी प्रदर्शनात आली भोवळ, समर्थकांमध्ये चिंता; कालच दिले राजकारणातून निवृत्तीचे संकेत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चिपळूण येथील कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना स्टेजवरच अचानक भोवळ आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षरक्षकांनी त्यांना तात्काळ खुर्चीवर बसवले आणि पाणी दिले. या कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी निलम राणेही उपस्थित होत्या. चिपळूणमध्ये आयोजित ‘कृषी व पशुधन प्रदर्शन २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यात नारायण राणे भाषण करत होते. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी नीलम राणे आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला संबोधित करत असताना अचानक राणेंना अस्वस्थ वाटू लागले. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांचा आवाज अचानक बसला आणि त्यांना चक्कर आल्यासारखे जाणवू लागले. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्यांनी आपले भाषण घाईघाईने आटोपते घेतले. डायककडून खुर्चीकडे जाताना नारायण राणे यांना भोवळ आली. यावेळी जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने आधार दिला. उन्हामुळे त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज सध्या चिपळूणसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट जाणवत असून तापमानाचा पारा वाढलेला आहे. कडक ऊन सहन न झाल्याने आणि उष्णतेच्या त्रासामुळे नारायण राणे यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी माध्यमांशी बोलण्यासही नकार दिला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते तातडीने आपल्या पत्नीसह विश्रामगृहाकडे रवाना झाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कालच दिले होते राजकारणातून निवृत्तीचे संकेत अवघ्या एक दिवसापूर्वी सिंधुदुर्ग येथील जाहीर सत्कार समारंभात नारायण राणे यांनी राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते. “वय झालंय, आता शरीर थकतंय. दोन्ही मुले आता राजकारणात पूर्णपणे सेट झाली आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांनी राजकारण पाहावे आणि मी कौटुंबिक बिझनेसकडे लक्ष द्यावे, असा विचार करत आहे,” असे राणे म्हणाले होते. नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना राजकारणातून मुक्त करण्याची विनंती देखील केली. राज्यसभा किंवा लोकसभा नको असून त्यांना आपला व्यवसाय करायचा असल्याचे नड्डा यांना स्पष्ट सांगितले. मात्र नड्डा यांनी त्यांची ही विनंती मान्य केली नाही. राणेजी, हम आपको छोडनेवाला नही है, असे म्हणत नड्डा यांनी राणेंना राजकारणात सक्रिय राहण्याची विनंती केली. हे ही वाचा… बाळासाहेबांनी समजावल्यामुळे एका उपशाखाप्रमुखाला जिवंत सोडले:नारायण राणेंनी सांगितला किस्सा गेली अनेक दशके आपल्या आक्रमक शैलीने राजकारण गाजवणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. “आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्यभरे,” अशा शब्दांत त्यांनी आपली राजकीय निवृत्ती जवळ आल्याचे स्पष्ट केले. सिंधुदुर्गातील सभेत बोलताना त्यांनी हे संकेत दिलेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेत असताना एक उपशाखाप्रमुखाला ठार मारणार होतो, पण बाळासाहेबांनी समजावल्यामुळे त्याला सोडले, असा किस्साही सांगितला. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर