ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी संबंध मात्र, आता राजकारणाला नवे वळण:रोहित टिळकांचा शिवसेना प्रवेश निश्चित, कसब्यातील जुने प्रतिस्पर्धी एकत्र

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराण्याचे काँग्रेसशी जवळचे संबंध राहिले आहेत. लोकमान्य टिळक मूळचे काँग्रेसचे नेते होते, तर स्वर्गीय जयंतराव टिळक यांनी काँग्रेसचे खासदार आणि विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 मध्ये कसबा विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली असून ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही राहिले आहेत. टिळक ट्रस्टकडून कर्तृत्वाच्या आधारे दिला जाणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने दुरावा ठेवल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले. इंदिरा गांधी आणि प्रणव मुखर्जी यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. मात्र आता यामुळे काँग्रेसचे काम थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित टिळक यांनी स्पष्ट केले. लोकमान्य टिळकांचे खापरपणतू रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ही घडामोड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या निर्णयामागील कारणांबाबतही चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आल्यापासून काँग्रेस नेतृत्व आणि रोहित टिळक यांच्यात मतभेद वाढल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून टिळक यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा होती. या घडामोडींमुळे काँग्रेस हायकमांड आणि टिळक यांच्यातील अंतर वाढत गेले आणि अखेर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रोहित टिळक आणि रवींद्र धंगेकर हे पूर्वी राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रोहित टिळक तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धंगेकर मैदानात उतरले होते. त्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार गिरीश बापट विजयी झाले होते. त्या वेळी टिळक यांना सुमारे 31 हजार तर धंगेकर यांना सुमारे 26 हजार मते मिळाली होती. आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात येण्याची शक्यता असल्याने कसब्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवासही अलीकडच्या काळात चर्चेत राहिला आहे. त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जोरदार लढत दिली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव केला. या काळात काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याची भावना व्यक्त करत धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सध्या ते शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. कसबा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार महापालिका निवडणुकीत धंगेकर यांनी आपल्या पत्नी प्रतिभा आणि मुलगा प्रणव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपविरोधात जोरदार लढत दिली होती. मात्र या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तरीही धंगेकर यांनी कोथरुड परिसरातील गुन्हेगारी आणि जैन बोर्डिंग प्रकरणावरून अनेकदा भाजप नेत्यांवर टीका केली होती. त्यांनी मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही उघडपणे आरोप केले होते. सभागृह नेते गणेश बीडकर यांच्याशीही त्यांचे राजकीय मतभेद कायम राहिले आहेत. आता रोहित टिळक यांच्या प्रवेशामुळे कसबा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात आणि त्याचा परिणाम धंगेकर यांच्या राजकीय भूमिकेवरही होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर