ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

संजय राऊत- मुरलीधर मोहोळ भेटीने चर्चांना उधाण:पुणे दौऱ्यात दोघांमधील भेट राजकीय चर्चेचा विषय; बैठकीआधी अनपेक्षित वळण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत एक वेगळीच घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजकीय विरोधक असतानाही दोघांमधील ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. ही भेट पूर्णपणे वैयक्तिक कारणासाठी झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अनेक वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. 14 एप्रिल रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यानंतर त्यांना किमान महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऑपरेशननंतर मोहोळ यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती देत लवकरच पुन्हा कामावर रुजू होणार असल्याचे संकेत दिले होते. सध्या ते पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक नात्यांना प्राधान्य दिल्याचे या प्रसंगातून दिसून आले. दरम्यान, संजय राऊत यांचा पुणे दौरा राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी शहरातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शहरातील संघटनात्मक स्थिती आणि आगामी रणनीती यावर चर्चा करण्यात आली. भेटीमुळे राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया या दौऱ्यात शिवसेना गटनेता पक्ष कार्यालयाचे उद्घाटनही पार पडले. त्यानंतर सारसबागसमोरील बाळासाहेब ठाकरे कलादालनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुणे शहरातील पक्षबांधणी, संघटन विस्तार आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील योजना यांचा आढावा घेण्यात येत आहे. एकूणच, संजय राऊत यांच्या पुणे दौऱ्यातील राजकीय हालचालींसोबतच मुरलीधर मोहोळ यांच्याशी झालेली भेटही विशेष ठरली आहे. या भेटीमुळे राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांमधील मानवी नात्यांची झलक पुन्हा एकदा समोर आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर