ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जून महिना उलटूनही पावसाचा अजून पत्ता नाही:बळीराजा चिंतेत, ढोरकीन परिसरात धूळपेरण्या वाया जाण्याची भीती‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जून महिना संपत आला तरी ढोरकीन आणि परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जिकडे पहावे तिकडे निरभ्र आकाश, कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे शेतातील ओल नष्ट झाली असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मागील दोन वर्षांतील अतिवृष्टीचे संकट झेलून सावरलेला शेतकरी आता दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. यंदा वेळेवर पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी नांगरणी, रोटाव्हेटर आणि वखरणीसारखी खरीपपूर्व मशागत करून जमीन पेरणीयोग्य केली होती. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कपाशी व तुरीची लागवड केली, तर अनेकांनी धूळपेरणी केली. मात्र, पावसाने दगा दिल्यामुळे ही महागडी बियाणे मातीतच सडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी परिसरातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त विहिरी आणि कूपनलिकांनी कधीच तळ गाठला आहे, तर उर्वरित २५ टक्के जलस्रोत जुलै उजाडताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. लवकर पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळते आणि ऐनवेळी यंत्रे मिळवताना धावपळ होत नाही, म्हणून जूनच्या सुरुवातीलाच तुरीची धूळपेरणी केली होती. मात्र, महिनाभर पाऊस पडलेला नाही. आता पाऊस आला तरी दुबार पेरणी करावीच लागेल, ज्यामुळे खर्च दुप्पट आणि उत्पन्न घटणार हे निश्चित आहे, असे परिसरातील सेतकरी रमेश मुळे यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी सरकारने जाचक अटी वगळून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे वाढलेले भाव कमी करावेत, बोगस बियाणे व खते विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. जनावरांसाठी पशुखाद्य उपलब्ध करावे आणि शेतीमालास योग्य हमीभाव द्यावा, अशा प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या आहेत. शेतकऱ्यांवर पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे मोसंबी, डाळिंब, संत्री या फळबागांसह ऊस आणि पालेभाज्या शेतकऱ्यांच्या नजरेसमोर जळून खाक होत आहेत. अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे. डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे मशागतीचा खर्च आधीच आवाक्याबाहेर गेला असताना, आता पेरणीचे संकट ओढवले आहे. एल निनोच्या सावटामुळे पावसाची शाश्वती नसल्याने शेतीचे संपूर्ण गणित कोलमडले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर