ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बारामती-राहुरी पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल:सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य; तर अक्षय कर्डिले बाजी मारतील, काय सांगतो एक्झिट पोल?

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. रिंगसाईड रिसर्च या कंपनीनेने केलेल्या एक्झिट पोल नुसार बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सुनेत्रा पवार यांना अभूतपूर्व असे तब्बल ९२ ते ९७ टक्के मतदान मिळू शकते आणि त्या विक्रम नोंदवतील असा अंदाज रिंगसाईड रिसर्चने वर्तवला आहे. तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कार्डिले हेही चांगल्या मतांनी विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अक्षय कार्डीले यांना ७८ ते ८३ टक्के मतदान मिळू शकते तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना ७ ते ९ टक्के इतके मतदान मिळू शकते असे रिंगसाईड रिसर्च चा एक्झिट पोल सांगतो आहे..बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्या असा प्रयत्न सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात आला होता. पण या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. पण या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनाच कौल मिळताना दिसतोय. काय सांगतोय रिंगसाईड रिसर्च चा एक्झिट पोल.. राहुरी पोटनिवडणूक : अक्षय कार्डिले – भाजप – ७८% – ८३% गोविंद मोकाटे – राष्ट्रवादी शप- ७% – ९% संतोष चोळके – वंचित – ३% – ५% रावसाहेब खेवरे – अपक्ष – ४% ते ६% इतर उमेदवार आणि नोटा – २% ते ३% तर बारामती पोटनिवडणुकीत आतापर्यंतच्या रेकॉर्डब्रेक मतांनी सुनेत्रा पवार विजयी होतील असे एक्झिट पोल सांगतो. सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी काँग्रेस – ९२% ते ९७% इतर उमेदवार आणि नोटा – ३% ते ८% असा अंदाज एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे.. ‘रुद्र रिसर्च’चा एक्झिट पोल काय सांगतो? अक्षय कर्डिले किती मतांनी विजयी होणार? ‘रुद्र रिसर्च’च्या सर्वेक्षणानुसार, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले तब्बल 1 लाख 17 हजार (62%) मतांच्या विक्रमी फरकाने एकतर्फी विजय मिळवून आपला गड राखतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार कर्डिले यांना 1,42,500 (76%) मते मिळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना केवळ 25,500 (14%) मतांवर समाधान मानावे लागेल. स्व. शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची माघार, विखे-पाटील कुटुंबीयांचा पाठिंबा आणि आमदार संग्राम जगताप व मोनिका राजळे यांनी अनुक्रमे अहिल्यानगर व पाथर्डी तालुक्यात केलेले प्रभावी निवडणूक नियोजन या बाबी कर्डिले यांच्या विजयासाठी निर्णायक ठरताना दिसत आहेत. याशिवाय, महाविकास आघाडीला प्रचारात आलेल्या मर्यादा, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यामुळे होणारे संभाव्य मतविभाजन आणि तगड्या विरोधकाचा अभाव यामुळे अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. सुनेत्रा पवार किती मतांनी होणार विजयी? ‘रुद्र रिसर्च’च्या सर्वेक्षणानुसार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार या 2 लाख 7 हजार मतांच्या विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार सुनेत्रा पवार यांना 2,12,000 (95%) तर इतर उमेदवारांना एकत्रितपणे केवळ 11,705 (5%) मते मिळण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबीयांचा मतदारसंघातील दांडगा संपर्क, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे जनमानसात असलेली सहानुभूतीची लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा आणि कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने विरोधात उमेदवार न दिल्याने सुनेत्रा पवारांचा विजय एकतर्फी मानला जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनानंतर दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख स्पर्धकांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग अधिक सुकर झाला असून, याचा मोठा फायदा सुनेत्रा पवार यांना होताना दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर