ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

श्रीराम व हरिहर संस्थानची 12 एकर जमीन हडपण्याचा घाट:संस्था अध्यक्षांची महसूलकडे तक्रार, महामार्गावर माेक्याची जागा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टिळक रोडवरील श्रीराम व हरिहर संस्थानची (मोठे श्रीराम मंदिर) रिधोरा परिसरात असलेली जमीन हडपण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षा सुमन विजय अग्रवाल यांनी महसूल विभागाकडे केली आहे. हे प्रकरण सध्या बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित आहे. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी हडपण्यासाठी अकोल्यातील भूखंड माफियांची टोळी चर्चेत आली आहे. संत गजानन महाराज यांच्या प्रेरणेने स्थापित मोठे श्रीराम मंदिर कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पुरातन असलेले हे मंदिर श्रीराम व हरिहर संस्थानकडून संचालित असून, संस्थानच्या जमिनी आहेत. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक, समाजिक उपक्रम राबवण्यात. रिधोरा परिसरात संस्थानची सुमारे १२ एकर जमीन आहे. ही जमिन वाहितीसाठी देण्यात आली होती. मात्र आता वारसाहक्काने ती ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पुढे आली. जमीन, प्रमाणपत्रप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर प्रशासकीय, फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षा सुमनदेवी अग्रवाल यांनी केली आहे. विश्वस्त संस्थेच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा तसेच महसूल प्रशासनातील अनियमिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत जमिनीबाबत महसुली कार्यवाही,खरेदी –विक्री , फेरफार नोंद, हस्तांतरण, ताब्यातील बदल किंवा मालकी हक्काशी संबंधित नोंद करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी आहे. प्रकरण जैसे थे ^गैरअर्जदारांनी कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे गैरअर्जदारांची बाजू एकूण घेणे आवश्यक आहे. सध्या प्रकरण जैसे थे आहे. लवकरच सुनावणी होईल. -संतोष यावलीकर, उपविभागीय अधिकारी, बाळापूर. प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी वारसांना शेतीवर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही श्रीराम हरिहर संस्थांकडून मंडळ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. जमिनीची मालकी संस्थानकडे आहे. संबंधित वाहितदराचे निधन झाले. त्यामुळे संबंधितांकडून वारसहक्काने शेतीच्या खरेदीसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. महसूल विभागाकडून हा अर्ज मंजूर करण्यात आला आणि खरेदी प्रमाणपत्रही देण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर