ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

संकटमोचक केवळ राजकारणापुरतेच का?:शेतकऱ्यांच्या संकटात गिरीश महाजन कुठे आहेत? जळगावात पोलिसांच्या मदतीने राजकीय हुकूमशाही- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणे गरजेचे होते. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली नाही. शेतकऱ्यांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. जळगावमधील जे लोकं सत्तेत आहे त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत, ते 24 तास राजकारण करतात, संकटमोचक गिरीश महाजन शेतकऱ्यांवर संकट आल्यावर कुठे असतात असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, बारामतीमध्ये कौटुंबिक कारणास्तव शरद पवार यांचा पक्ष कदाचित निवडणूक लढणार नाही, पण इतरांना निवडणूक लढवू नये असे सांगू नये. ही लोकशाही आहे, त्यावर एकत्र बसत निर्णय घ्यावा लागेल. मविआतील नेते एकत्र बसून या दोन्ही जागा संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेने राहुरीत लढावे असे आमचे कार्यकर्ते सुद्धा म्हणत आहे. भाजपला मदत होईल असे निर्णय घेऊ नये ही आमची भूमिका आहे. महाजन केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? संजय राऊत म्हणाले की, संकटमोचन हे केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? शेतकऱ्यांवर जेव्हा संकट येतात तेव्हा हे काही काम करताना दिसत नाही. केवळ पक्ष फोडणे, आमदार, नगरसेवक पळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे का? हे राज्याचे दुर्दैव आहे. जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही संजय राऊत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे, पोलिसांनी स्वत:ला वर्दीतील गुंड समजू नये. जळगावमध्ये पोलिस गणवेशातील हुकुमशाही आहे, त्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही जोर ओसरणार आहे. शिंदे गटाचे आमदार हे संकटमोचकाच्या संपर्कात आहेत ते पुढची निवडणूक भजपमधून लढवतील असे वाटते. तिन्ही पक्षाने एकत्र निर्णय घ्यावा संजय राऊत म्हणाले की, राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे. मविआ म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीवर चर्चा होते, काँग्रेस अनेक ठिकाणी सर्वांत आधी निवडणूक लढवण्यासाठी पुढे जाते निकालानंतर कळते आपण कुठे आहोत. जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्याच पक्षाने निवडणूक लढवावी. मविआतील तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीचा विचार केला पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर